शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक; साडेनऊ लाखांची दारू जप्त; भरारी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 07:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दमणहून मुंबईच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका वाडा-खडकोना गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दमणहून मुंबईच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका वाडा-खडकोना गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर उभी होती. गुरुवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात छुप्या पद्धतीने दारूचा साठा आढळला. 

भरारी पथकाने कारवाई करत दारूचा साठा, रुग्णवाहिकेसह ९ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रुग्णवाहिकेतून दमण बनावटीच्या दारूची तस्करी सुरू असल्याबाबत माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी सकाळी ९ वाजता वाडा-खडकोना गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर सापळा रचला. यात रुग्णवाहिकेत विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या कप्प्यांमध्ये दमण बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.

दारू वाहतूक कशा पद्धतीने?रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस बसण्याकरिता लाकडी बॉक्सची आसने आणि स्ट्रेचर असल्याचे आढळून आले. अधिक तपासणी केली असता रुग्णवाहिकेमधील लाकडी बॉक्स आणि ड्रायव्हरच्या सीटच्या मागे तयार केलेल्या विशेष कप्प्यात दमण बनावटीच्या दारूचा साठा आढळला. रुग्णवाहिकेमधील सात बॉक्समधून ८४ बल्क लिटर दमण बनावटीचा दारूसाठा जप्त केला. मात्र हा छापा पडताच रुग्णवाहिका चालक घटनास्थळावरून फरार झाला.