शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

ट्रान्सफार्मर बिघाडला लोडशेडिंग

By admin | Updated: July 7, 2017 06:04 IST

तारापूर एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनीच्या १३२/१३३ के.व्ही. उपकेंद्र एक मधील पन्नास मेगा व्होल्ट अँपियर (एम.व्ही.ए) क्षमतेच्या

पंकज राऊत/ लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर: तारापूर एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनीच्या १३२/१३३ के.व्ही. उपकेंद्र एक मधील पन्नास मेगा व्होल्ट अँपियर (एम.व्ही.ए) क्षमतेच्या ट्रान्सफार्मरमध्ये बुधवार रात्री १०:३० च्या सुमारास बिघाड झाल्याने एमआयडीसीतील उद्योगांसह हजारो वीजग्राहकांच्या वीजपुरवठयावर गंभीर परिणाम झाला असून अनेक भागात भारनियमन सुरु झाले आहे. हा ट्रान्सफॉर्मर बदलण्यास आठवडा लागणार आहेनादुरूस्त झालेल्या ट्रान्सफार्मर मधून ३३/११ के.व्ही. क्षमतेच्या एमआयडीसीमधील एन झोन मध्ये 2 , कॉन्टेसा हॉटेल च्या मागे २, देदाल्याला एक तसेच ३ फिडर हायटेक्शन वीजग्राहकाचे ३ फिडर अशा एकूण आठ फिडरला वीजपुरवठा होत असल्याने त्यावरील हजारो वीजग्राहकांना झळ सोसवी लागणार आहे तर एवढया मोठया भागाला वीजपुरवठा करतांना वीज वितरणासाठी अक्षरश: कसरत करावी लागणार आहे.घटनास्थळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. डोंगरे व महापारेषण कंपनीच्या टेस्टिंग विभागाच्या टीमने गुरुवारी सकाळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. हा ट्रान्सफॉर्मर बदलण्यास किमान पाच ते सात दिवसांचा अवधी लागणार असल्याने त्याच्या वीजपुरवठ्याचा लोड इतर ट्रान्सफॉर्मरवर टाकण्याचे काम सुरु केले आहे.याच उपकेंद्रत ५० एमव्हीए क्षमतेचा अन्य ट्रान्सफॉर्मर असून दोन्ही ट्रान्सफॉर्मरच्या १०० एमव्हीए क्षमते पैकी ६० एमव्हीएचा लोड फक्त एमआयडीसीचा तर उर्वरित १३ एमव्हीएचा लोड बोईसरसह चिंचणी, वरोर, वाणगाव, नांदगाव, शिवाजीनगर या ग्रामीण भागाचा आहे. या ७३ एमव्हीए पैकी ४७ एमव्हीए लोड शेजारच्या ट्रान्सफॉर्मर वर डायव्हर्ट केला असून्ा १५ एमव्हीए लोड खैरापाडा येथील २२०/१३२/३३ के .व्ही. क्षमतेच्या उप केंद्रात वळविण्यात आला आहे त्यामुळे बराच प्रश्न मार्गी लागला तरी उर्वरित ११ एमव्हीए लोड करिता भारनियमन करावे लागणार आह.े त्याची झळ वरोर, वाणगांव, नांदगांव,चिंचणी , शिवाजीनगर (सालवड), एमआयडीसीमधील हाय टेन्शन वीज ग्राहक, तसेच बोईसर मधील ओस्तवाल अमेया पार्क ,नवापूर नाका, स्टेशन परिसर, सरावली ओस पाडा, इत्यादी ठिकाणच्या वीज ग्राहकाना बसणार असून उद्या पर्यंत हा ११ एमव्हीए सुद्धा खैरापाड्यावर डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न ही सुरू आहेत.लोड केला डायव्हर्टऔद्योगिक क्षेत्रातील रात्री वीजपुरवठा बंद करून नागरी वीजपुरवठा करण्यात येणार आहे तर दिवसा ग्रामीण भागात ८ ते १० तासचे लोडशेडींग होईल लोड डायव्हर्ट युद्ध पातळीवर सुरु आहे .ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याची झळ वीज ग्राहकांना कमीत कमी बसावी या करिता इतर ट्रान्सफॉर्मर वर लोड डायव्हर्ट करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येईल. -दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, पालघर