शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मिळाल्या मनासारख्या बदल्या, अधिक्षकांची सहृदयता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:18 IST

जिल्हा निर्मिती नंतर पोलीस दलात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाच्या साथीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी आज पर्यंत समाधानकारकरित्या केलेले आहे

पालघर : पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना दिवसरात्र आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने अनेक सण-उत्सव, सुख-दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबा पासून त्यांना दूर राहण्याची वेळ ओढवते. अशावेळी १४२ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंती च्या ठिकाणी बदली देत त्यांच्या भावनांवर हळुवार पणे फुंकर घालून त्यांच्या व्यथा कमी करण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी केला आहे.

जिल्हा निर्मिती नंतर पोलीस दलात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाच्या साथीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी आज पर्यंत समाधानकारकरित्या केलेले आहे. वाढते नागरिकीकरण आणि त्या अनुषंगाने वाढणाºया गुन्हेगारीला (वसई तालुका वगळता) थोपविण्याचे काम वाढत्या ताणतणावात ही पोलिसा कडून करण्यात आलेले आहे. २८ मे रोजी पालघर पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाची बैठक पोलीस अधीक्षक गौरव सिंग ह्यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. ह्यावेळी पोलीस दलातील कर्मचारी हे अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही. निवडणुका बंदोबस्त, त्या अनुषंगाने येणारे मंत्री, नेते ह्यांचे संरक्षण, सण-उत्सव, आंदोलने-मोर्चे आदी सह गुन्ह्यांचा तपास, गुन्हे रोखणे आदी मोठी जबाबदारी पोलिसांवर पडते. अशावेळी आपले कर्तव्य बजावतांना त्यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागतो. अशावेळी त्यांच्यावर येणाºया ताण- तणावा पासून दूर करीत त्यांना आपल्या कुटुंबिया सोबत वेळ देता यावा ह्यासाठी पोलीस अधीक्षकांनी त्याच्या पसंती प्रमाणे बदलीचे स्थान अशा नवीन पद्धतीचा अवलंब करुन त्यांना सुखद धक्का दिला आहे. यामुळे जिल्हयातील वर्दीत समाधान निर्माण झाले आहे.अशी होती बदली प्रक्रीयातीन पसंतीक्रम घेऊन नालासोपारा, वालीव, विरार, अर्नाळा, पालघर, सातपाटी, डहाणू, घोलवड, मनोर, विक्रमगड, बोईसर, सफाळे आदी १७ पोलीस स्टेशन मधील १४२ बदलीपात्र कर्मचाºयांपैकी ११७ कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली केली आहे

टॅग्स :Policeपोलिस