शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मागोवा 2020 : वसई-विरार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:20 IST

Vasai-Virar : सत्ताधारी बविआने पुन्हा आम्हीच म्हणून शेवटच्या सभा बैठका, महासभा फेब्रुवारी 2020 पर्यंत उरकून घेतल्या. कारण त्यांचे सर्व लक्ष निवडणुकीकडे लागल होते.

- आशीष राणे

वसई : ३१ डिसेंबर २०१९ ला तत्कालीन महानगरपालिका आयुक्त बी. जी. पवार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पालिकेत एक वेगळेच नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. गुडघ्याला बाशिंद बांधून पुन्हा सत्तेची चावी मिळवण्यासाठी बविआसहीत सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कधी लागते याची नवीन वर्ष जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान वाट पाहत राहिले. सत्ताधारी बविआने पुन्हा आम्हीच म्हणून शेवटच्या सभा बैठका, महासभा फेब्रुवारी 2020 पर्यंत उरकून घेतल्या. कारण त्यांचे सर्व लक्ष निवडणुकीकडे लागल होते.  

सत्ताधारी-आयुक्त वाद चव्हाट्यावरएप्रिल - मे २०२० ला नगरविकास विभागाने आदेश काढून वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि आयुक्त गंगाथरन डी. यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केले. जूनमध्ये सत्ताधारी बविआ, महापौर विरोधात आयुक्त असा वाद चव्हाट्यावर आला.  आयुक्तांनी कोरोनाच्या धर्तीवर सत्ताधाऱ्यांना एकही सभा बैठक व महासभा घेऊन दिली नाही. २८ जूनपासून आयुक्त हेच प्रशासक झाले. तेव्हापासून तेच आजवर कारभार हाकीत आहेत.  

सूचना, हरकतीबाबत वाद आणि ठिणग्या प्रशासकराज आल्यावर आयुक्तांनी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आणि वाद रंगत गेला. महापालिका निवडणुका व प्रभाग सूचना, हरकती याबाबत वाद, ठिणग्या उडतच राहिल्या.

पालिकेचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडेतीन महिन्यांत महापालिका प्रशासनाचा कारभार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र काळाने घात केला आणि बेंगलोर व मुंबईत पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. वसईत १३ मार्चला पहिला रूग्ण सापडला. त्याचदरम्यान लाॅकडाऊन जाहीर झाले.

राजकीय पक्ष आक्रमक जुलै-ऑगस्टमध्ये दररोज आयुक्तांविरोधात विविध आंदोलनांनी डोके वर काढले. त्यात मनसे, भाजप यांनी थयथयाट केला.  सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली, तर सत्ताधारी बविआने आयुक्तांशी जुळवून घेत नमते धोरण स्वीकारले. नोव्हेंबरपर्यंत आयुक्तांनी कोविड केंद्र, रूग्ण, वैद्यकीय अधिकारी याबाबत निर्णय घेतले व ते प्रभावी ठरले.

नवे आयुक्त नियुक्त ८ एप्रिलला महापालिका प्रशासनात महाविकास आघाडीने थेट आयएएस दर्जा प्राप्त आयुक्त गंगाथरन डी. यांना धाडले. एप्रिल महिन्यात कोरोना बळावत असताना सत्ताधारी बविआ व पालिका आयुक्त यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली व ती आजही धगधगत आहे. 

वसईकरांमध्ये नाराजी डिसेंबरमध्ये व्यापारीवर्गाला परवाना शुल्क लावल्यामुळे सत्ताधारी बविआ तोंडघशी पडली. मात्र आता बविआ सारवासारव करताना दिसत आहे. गेले आठ महिने लोकांची विज बिले भरमसाट आली असताना वसईत कोणत्याही पक्षाने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे वसई-विरारकरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार