शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील पर्यटन धोक्यात, २३० कोटींचा खर्च वाया ? : प्रदूषणामुळे बंहुसंख्य बीचेस झाले काळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:36 IST

पालघर जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत किनारपट्टीवरील केळवे सह अन्य विविध गावांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्याला सन २०१५ पासून २३० कोटी ३ लाख ८२ हजाराचा वितरित झालेला निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालघर : पालघर जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत किनारपट्टीवरील केळवे सह अन्य विविध गावांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्याला सन २०१५ पासून २३० कोटी ३ लाख ८२ हजाराचा वितरित झालेला निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तारापूर औद्योगिक वसाहती मधून क्षमतेपेक्षा अधिक प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याने किनाº्यालगतचे पाणी काळे-पिवळे झाले असून दुसरीकडे थेट समुद्रात ७.१ किमी अंतरावर पाईपलाईन द्वारे प्रदूषित पाणी सोडले जाणार असल्याने समुद्रकिनारे दुर्गंधीयुक्त, प्रदूषित होऊन पर्यटकांची संख्या रोडवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये सुमारे ३ ते ४ हजार लहान, मोठे कारखाने असून ह्या कारखान्यातून निघणारे प्रदूषित रासायनिक पाण्यावर प्रक्रि या करण्यासाठी २५ एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले होते. मात्र कारखान्याच्या वाढत्या संख्येने या शुद्धीकरण प्रक्रि येची क्षमता मर्यादित ठरल्याने ५० एमएलडी क्षमतेच्या नवीन शुद्धीकरण प्रक्रियेची उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. ही पाईपलाईन समुद्रात ७.१ किलोमीटर्स आत जाणार असल्याने प्रदूषणाची मात्रा वाढणार आहे. पूर्वी ही लाईन समुद्रकिनाऱ्यापर्यंत मर्यादित असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने आणि मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत असल्याचे स्थानिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले होते.मग जर ही लाईन समुद्रात खोलवर सोडली तर प्रदूषणाची मात्रा वाढून सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू या भागाच्या समोरील लहान बोटीद्वारे केली जाणारी मासेमारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे किनारपट्टीवरील खाडीतील बोय, शिंगटी, शिंपले आदी माशांना रॉकेलमिश्रीत वास येत असल्याने माश्यांची विक्र ी होत नाही. त्याचप्रमाणे शेवंड, पापलेट,कोत, दाढा,घोळ आदी माश्यांनाही भविष्यात रॉकेल मिश्रित रसायनाचा वास येण्याची शक्यता आहे. प्रदूषणामुळे इथला निसर्ग उध्वस्त होत नामशेष होण्याच्या दिशेने मार्गक्र मण सुरू असल्याचे सांगून कोकण वाचिवण्याच्या आमच्या आंदोलनात प्रदूषणाविरोधात ही आमची लढाई राहणार असल्याचे लोकमतला सांगितले.- संजय यादवराव, अध्यक्ष, समृद्ध कोकण संघटना५० इमएलडी क्षमतेच्या पाईपलाईनचे काम अपूर्णावस्थेत असल्याने दररोज २ पैसे प्रति लिटर असे दररोज ५ लाख रु पये दंड म्हणून विभागीय कोकण आयुक्तांकडे भरण्याची नोटीस बजावली आहे. मात्र पैसे अजूनही जमा केलेले नाहीत.- मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारीकरोडोंचा निधी झाला खर्च, अनेक कामे सुरूजिल्हा पर्यटन विकास कार्यक्र मांतर्गत सन २०१५-१६ साठी जिल्हास्तरीय पर्यटन विकास कार्यक्र मा अंतर्गत वन पर्यटन, प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत १३८ कोटी ८ लाख १९ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ९० कोटी ५ लाख १८ हजाराच्या निधीतून ८९ कामे मंजूर करण्यात आली आहे.२०१६-१७ साला करिता १२९ कोटी २ लाख २३ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ८० कोटी १लाख ३३ हजाराच्या निधीतून ६१ कामे मंजूर करण्यात आली असून ११ कामे पूर्ण झाली असून ५० प्रगतीपथावर आहेत.सन २०१७-१८ साला करिता ११४ कोटी ७ लाख ३२ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ५९ कोटी ७ लाख ३१ हजाराच्या निधीतून ३१ कामांना मंजुरी मिळाली पण एकही काम पूर्ण झाले नसून ३१ अशी सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.सन २०१५ ते २०१८ सालात एकूण ३८२ कोटी ७ लाख ४७ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून २३० कोटी ३ लाख ८२ हजारा च्या निधीतून १८१ कामांना मंजुरी मिळाली असून ८४ कामे पूर्ण होत ३१ कामे प्रगतीपथावर असून पर्यटनाला मोठा वाव देण्यात आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpollutionप्रदूषण