लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : वाडा-मनोर मार्गावरील वरले गावा जवळील बस थांबा कधी ही पडे अशा अवस्थेत असून काही दिवसांवर आलेला पावसाळा पहाता त्याची तातडीने पुर्नबांधणी होणे आवश्यक आहे. तुटलेले पत्रे, तडे पडलेल्या भींती तसेच भटक्या जनावरांचा वावर यामुळे प्रवाशांसाठी तो धोक्याचा ठरत आहे. एस.टी. प्रशासनाकडे या बाबत तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही.भिवंडी - वाडा - मनोर या महामार्गाचे चौपदरीकरण करताना अनेक गावचे बसथांबे तोडण्यात आले आहेत. मात्र, तोडलेले बस थांबे बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना पावसाळा व उन्हाळ्यात ताटकळत उभे राहावे लागत आहे. काही गावचे बस थांबे आहेत ते अतिशय जीर्ण झाले असून मोडकळीस आले आहेत. अनेक वेळा एसटी प्रशासनाकडे तक्र ार करूनही त्याकडे गांभीर्याने बघितले जात नसून प्रशासन एखादा जीव घेण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भोईर यांनी विचारला आहे. यासंदर्भात साबाचे उपअभियंता अरविंद कापडणीस यांनी वरले बसथांब्याच्या दुरूस्तीचे पत्र संबंधिताना तत्काळ देऊन दुरूस्ती करून घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
वरले बसथांबा कधीही कोसळण्याच्या स्थितीत
By admin | Updated: May 13, 2017 00:37 IST