शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू, वसईत महिन्याभरातील दुसरी दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 20:44 IST

Vasai Virar News: वसईच्या रानगाव येथील एचडी नावाच्या रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही मुलगी आपल्या आजीसह या रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आली होती.

- मंगेश कराळेनालासोपारा - वसईच्या रानगाव येथील एचडी नावाच्या रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही मुलगी आपल्या आजीसह या रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आली होती. रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून चिमुकल्या मुलींचा मृत्यू होण्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना आहे.

रानगाव समुद्रकिनार्‍यावर एचडी नावाचे रिसॉर्ट आहे. समीक्षा जाधव (७) ही चिमुकली आजीसह भांडुप येथे राहते. सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने ती आजीसह या रिसॉर्टमध्ये आली होती. त्यांच्यासोबत अन्य १४ महिला होत्या. सकाळी सर्वजण स्विमिंग पुलमध्ये उतरले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सर्वजण जेवणासाठी बाहेर आले होते. तिची आजी आणि अन्य महिला जेवणाच्‍या रांगेत उभ्या होत्या. त्यावेळी समीक्षा नजर चुकवून पुन्हा स्विमिंग पुलमध्ये गेली. मात्र पाण्यात ती बुडू लागली. ती ओरडू लागल्यानंतर तिच्याकडे लक्ष गेले. तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तो पर्यंत नाकातोंडात पाणी गेल्याने ती बेशुद्ध पडली होती. तिला उपचारासाठी वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या प्रकरणी वसई पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा सगळे जण जेवणाच्या रांगेत होते. रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये जीवरक्षक होते. पंरतु जेवणाची वेळ असल्याने ते जागेवर नव्हते. खेळता खेळता समीधा स्विमिंग पुलमध्ये गेली आणि ही दुर्घटना घडली, असे वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले. समीधा ही आजीसोबत रहात होती. तिची आजी घरकाम करते. तिची आई तिला सोडून गेली असून वडील गावी राहतात. तिच्या या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

महिन्याभरातील दुसरी दुर्घटना८ मे रोजी याच रानगावमध्ये असेलल्या रॉयल रिसॉर्टमध्ये रिद्धी उर्फ प्रांजल माळी (१०) या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वसई पोलिसांनी रिसॉर्ट मालकाच्या विरोधात कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdrowningपाण्यात बुडणे