शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सफाळ्यात रंगला मॅटवरील इनडोअर कबड्डीचा थरार; श्रीराम विरार संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:17 IST

या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम विरार संघाने  तर  द्वितीय क्रमांक कुलाई सफाळा संघाने पटकावला.

सफाळे : जिल्हा परिषद मराठी शाळा नारोडा येथील  मैदानात मॅटवरील इनडोअर भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा पालघर जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री कुलाई  क्रीडा मंडळ, सफाळे  यांनी आयोजित केल्या  होत्या. निमंत्रित पुरुष २४ संघ व महिला १२ संघ  सहभागी झाले होते. 

या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम विरार संघाने  तर  द्वितीय क्रमांक कुलाई सफाळा संघाने पटकावला. तृतीय विजेतेपदाचा मानकरी अष्टभुजा रानगाव व दिनकरपाडा स्पोर्ट  संघ ठरला, तर  महिला गटात प्रथम क्रमांक श्रीराम संघ विरार यांनी बाजी मारली, तर द्वितीय क्रमांक कुलाई क्रीडा मंडळ सफाळे यांनी पटकावला.   या स्पर्धेचे आयोजन मंडळाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री व जिल्हा परिषद सदस्या  मनीषा निमकर यांनी केले.  

या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी आमदार राजेश पाटील, आ. श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश सांबरे, वसई-विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण राऊत, महेंद्र ठाकरे, पिका पडवले यांनी उपस्थिती दर्शवली. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कबड्डी स्पर्धेत  विशेष म्हणजे मंडळाकडून आलेल्या पाहुण्यांना  शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह  देऊन स्वागत करून सन्मानित करण्यात येत होते.

टॅग्स :Kabaddiकबड्डी