शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

व्यापाऱ्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक; हल्ला करण्यासाठी दिली होती चार लाखांची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:15 IST

विरारच्या गोपचरपाडा येथे राहणाऱ्या व व्यापाऱ्यावर शनिवारी रात्री ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.

 (मंगेश कराळे)

नालासोपारा: विरारच्या गोपचरपाडा येथे राहणाऱ्या व व्यापाऱ्यावर शनिवारी रात्री ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. हा हल्ला करण्यासाठी मुख्य आरोपीने त्याच्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपींना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

विरारच्या गोपचरपाडा येथे राहणारे मोबीन शेख (४२) एलईडी लाईटचे व्यापारी आहेत. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे ऍक्टिव्हा दुचाकीवरून मकवाना कॉम्पलेक्स परिसरात बाजारात जात असताना दोन आरोपींने त्यांचे जवळील ऍसिड या अत्यंत दाहक व ज्वलनशील पदार्थाने भरलेली प्लास्टीक पिशवी त्यांच्या त्यांच्या मानेला लागली. त्यांना ताबडतोब अनुसया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराच्या माहितीवरून मुख्य आरोपी मस्तान उस्मान शेख (३९), संकेत परमेश्वर शर्मा (१८) आणि जयेश तरे (२२) या तिघांना ४८ तासांच्या आत विरारच्या वेगवेगळ्या परिसरातून अटक केले आहे. आरोपी मस्तान याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपी संकेत शर्मा आणि जयेश तरे या दोघांना चार लाख रुपयांची सुपारी देवून त्यांचेकरवी मोबिन यांचेवर ऍसिड हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी मस्तान याचा पुर्वइतिहास पडताळुन पाहता त्याचेविरुध्द विरार पोलीस ठाण्यात मारामारी व सरकारी कामात अडथळा आणलेबाबत गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, मसुब प्रविण वानखेडे तसेच संतोष चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपारा