पालघर : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती,जमाती कायद्यात (अॅट्रॉसिटी) बदल केलेल्या निर्णयाचा पुनिर्वचार करावा अशी मागणी पालघर जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने शासनाकडे केली असून याबाबतीचे निवेदन आज जिल्हाधीकारी याना सुपूर्द केले. या निर्णयाचा पुनिर्वचार करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन या समाजाच्या उत्थानासाठी सहाय्य करून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे काँग्रेसच्या या विभागाने म्हटले असून अॅट्रॉसिटी साठी संविधानात तरतूदही आहे त्याचे योग्य ते संरक्षण करण्याची मागणीही त्यांनी यावेळी निवेदनामार्फत केली आहे. या विभागामार्फत जातीय आधारे अत्याचार करणे, मानवी नैसिर्गक हक्काची पायमल्ली करणे हे प्रकार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा गरजेचे असल्याचे म्हटले असून त्या कायद्याचा योग्य तो विनियोग व्हावा यासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
‘अॅट्रॉसिटी बदलाचा विचार व्हावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:32 IST