शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारचे पाणी रोखणारेच आता मतांची भीक मागत आहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:31 IST

सूर्या धरणाचे जे पाणी शासनाने वसई विरार नालासोपारा प्रदेशाला देऊ केले आहे. त्याला ज्यांनी विरोध केला तेच महाभाग आता या परिसरात मतांची भीक मागत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन बहुजन विकास आघाडीने मतदारांना केले आहे.

पालघर - सूर्या धरणाचे जे पाणी शासनाने वसई विरार नालासोपारा प्रदेशाला देऊ केले आहे. त्याला ज्यांनी विरोध केला तेच महाभाग आता या परिसरात मतांची भीक मागत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन बहुजन विकास आघाडीने मतदारांना केले आहे.गेल्या १० वर्षात बविआने जिल्ह्यात केलेली विकासकामे तसेच कार्यकर्त्यांची उभारलेली फळी लक्षात घेता त्यांना विजयापासून कसे दूर ठेवता येईल,यासाठी विरोधक निरिनराळे हाथखंडे वापरत आहेत. शुक्रवारी झालेल्या बविआच्या जाहीर सभेला लाभलेली मतदारांची उपस्थिती न भूतो न भविष्यती अशी होती.आ.हितेन्द्र ठाकुर यानी केलेल्या विकासकामांमुळे बविआचे तीन आमदार निवडून आणण्याची किमया घडवून दाखविली. १९९० ते २००२ या काळात तब्बल एक तप हा उपप्रदेश पाणीटंचाईत होरपळला असतांना आपली राजकीय ताकद पणाला लावून आ. ठाकूर यानी सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प मार्गी लावला.वाढती लोकसंख्या लक्षात घेवून त्यानी दुसº्या टप्प्याचीही तयारी केली,अनेक अडथळे पार करत ही अतिरिक्त १०० द.ल.ली.ची पाणीपुरवठा योजनाही मार्गी लावली. परंतु हे पाणी वसई-विरारला देण्यात येवू नये, यासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले, तेच नेते आता मतासाठी झोळी घेवून फिरत आहेत.गेल्या २५ वर्षात, बहुजन विकास आघाडीने कधीही विरोधाचे राजकारण केले नाही, उलट प्रत्येक नागरिकांचे राहणीमान सुधारावे, त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसवणाऱ्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी सातत्याने इतराना सहकार्य देऊ केले. त्याबदल्यात लोकानीही बविआला भरभरून मते दिलीत.लोकांनी जो विश्वास बविआवर दाखवला तोच विश्वास या पोटनिवडणुकीत मतदार नक्कीच दाखवतील असा आशावाद बविआने व्यक्त केला आहे.व्यक्तिगत प्रचारावर भरवसई, विरार, नालासोपारा, बोईसर हा आपला बालेकिल्ला असल्याने झगमगाटी प्रचाराऐवजी मतदारांशी व्यक्तिगत संपर्क साधणारा प्रचार करण्यावर बविआने हेतूत: भर दिला होता. त्यामुळेच आपला उमेदवार विजयी होईल असा आशावाद तिने व्यक्त केला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या