शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

थर्टीफर्स्टवर पोलिसांची करडी नजर; दारूपार्ट्या, मद्यपी वाहनचालक रडारवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 10:38 IST

पालघर हा जिल्हा मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच शेजारच्या गुजरात राज्यालाही जवळचा आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला असल्याने बहुसंख्य पर्यटक समुद्रकिनारपट्टी भागांत भटकंती आणि रात्रीच्या वेळी दारूपार्ट्या करण्याला प्राधान्य देतात.

पालघर : पालघर जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जल्लोष होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांसह प्रशासन सतर्क झाले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या दारूपार्ट्यांवर नजर ठेवली जात आहे, तसेच ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पालघर हा जिल्हा मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच शेजारच्या गुजरात राज्यालाही जवळचा आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला असल्याने बहुसंख्य पर्यटक समुद्रकिनारपट्टी भागांत भटकंती आणि रात्रीच्या वेळी दारूपार्ट्या करण्याला प्राधान्य देतात. या अनुषंगाने जिल्ह्यात बव्हंशी हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल झालेली आहेत. थर्टीफर्स्टच्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे आणि त्यानंतर नवीन वर्षात सुरुवातीलाच शनिवार, रविवार, असा सुटीचा दिवस असल्यामुळे सलग तीन दिवस मौजमस्तीसाठी मिळणार आहेत. पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे विविध ठिकाणच्या नागरिकांचा ओढा असतो. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे कडक निर्बंध होते. मात्र, यावेळी निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता आहे. मात्र, आधीच झालेले बुकिंग लक्षात घेता अनेकांना गर्दी टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पोलिसांची तसेच प्रशासनाची असलेली करडी नजर पाहता व्यावसायिकांना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. पालघर जिल्हा हा समुद्रकिनारी भाग, तसेच निसर्गाने नटलेला आहे. यामुळे येथे पर्यटन व्यवसाय बहरला आहे. मात्र, समुद्री पर्यटनाला पसंती देणाऱ्या ग्राहकांबरोबरच उपाहारगृहांनाही नवीन निर्बंध पाळावे लागणार आहेत. यामुळे ऐन हंगामात मंदीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती आता व्यावसायिकांनी व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यातील हॉटेल आणि कृषी पर्यटन केंद्रांच्या ऑनलाइन बुकिंगला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे या व्यवसायाला या हंगामात झळाळी आल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :palgharपालघर