मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसलेल्या मनोर गावामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट असून आतापर्यंत येथील मोबाईल तसेच किराणामालाच्या दुकानामध्ये रात्रीच्या सुमारास चोऱ्या झाल्या आहेत. या बाबत तक्रारी होऊनही परिस्थितीत बदल होत नसल्याने येथील पोलीस यंत्रणा पुन्हा चर्चेत आली आहे.मस्तान नाक्यावरील कोहिनुर बिल्डिंग मधील आशिष मोबाइल स्टोरचे शटर पहाटे दीड वाजता कटरच्या सहाय्याने तोडून सुमारे पावणे दोन लाख रुपये किंमतीचे मोबाईल आणि लॅपटॉप चोरट्यांनी लांबवले. महामार्गा लगत असलेल्या या वाणिज्य वापराच्या इमारतीमध्ये सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांचे फावले असल्याचे दुकानदार आशिष यादव यांनी सांगितले.दुसरी घटना मनोर गावातील खेळीलाल याच्या दुकानाचे शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यातील रक्कम चोरीस गेली आहे. लाखो रुपयांच्या या चोºयांमुळे ग्रामस्थ हवालदिल झालेले असले तरी रात्रीच्या गस्तींमध्ये वाढ झालेली नाही.
चोरट्यांचा धुमाकूळ, कारवाई होत नसल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 02:27 IST