शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी केले महिलांच्या डब्याला लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 05:07 IST

पाच वर्षे केली लुटालूट : विरार ते वैतरणा दरम्यानच्या प्रवासात करायचे चोऱ्यामाºया

नालासोपारा : पश्चिम रेल्वेच्या विरार ते वैतरणा या स्थानकादरम्यान महिलांच्या डब्यात भुरट्या चोरांकडून गेल्या पाच वर्षात ३९ लाख ३६ हजार ८२ हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. विरार ते वैतरणा या दोन स्थानकादरम्यान गेल्या पाच वर्षात महिलांच्या रेल्वे डब्यात चेन, मंगळसूत्र,पर्स व मोबाईल चोरीच्या ११२ घटना घडल्या आहेत.त्यात ३९ लाख ३६ हजार ८२ रुपयाच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. या दोन स्टेशनादरम्यान एवढ्या मोठ्या मुद्देमालाची चोरी झाल्यामुळे पालघर, डहाणू विभागातील महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

वसई रोड रेल्वे पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र हे मिरा रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान आहे. सन २०१३ या वर्षात चोरीच्या १२ घटना घडल्या असून त्यापैकी ९ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात ४३९९०० रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी २९६९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सन २०१४ या वर्षात चोरीच्या २० घटना घडल्या असून त्यापैकी ८ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात १०६५५१० रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता .त्यापैकी १९११०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सन २०१५ या वर्षात चोरीच्या ७ घटना घडल्या असून त्यापैकी ३ गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 386429 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी 124670 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2016 या वर्षात 5 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 2 गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 170424 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता . त्यापैकी 53750 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2017 या वर्षात 30 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी ? गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 681747 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता. त्यापैकी 36699 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे. सन 2018 या वर्षात 38 चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 2 गुन्हे उघडकीस आणले गेले आहेत. यात 1192072 रूपयाचा मुद्देमाल चोरी झाला होता .त्यापैकी 20500 रूपयांचा मुदैमाल जप्त करण्यात आला आहे.सुरक्षा धोक्यात, तपासात येतात अडचणीच् वसईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी याबाबत रेल्वेकडून माहिती मिळवली असता फक्त एका स्थानकादरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या डब्यात चो-या होऊ लागल्याच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.चोºया भुरट्या स्वरुपाच्या असल्याने व गुजरातची सीमा अगदी जवळ असल्याने गुन्हेगार हिस्ट्रीशिटर नसतात. त्यांची कोणतीही कुंडली पोलिसांकडे नसते. गुन्हा केला की ते परराज्यात पळून जातात. यामुळे तपासात अडचणी निर्माण होतात

टॅग्स :localलोकलCrimeगुन्हाVasai Virarवसई विरार