शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ बेपत्ता कुटुंबीय उज्जैनमध्ये, कर्जबाजारी झाल्याने भूमीगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 03:18 IST

- शशी करपेवसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील सहाही जण भूमीगत झाल्याचे तपासात उजेडात आले आहे.विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील वरुण सतीशचंद्र शर्मा, अनिता सतिशचंद्र शर्मा, ...

- शशी करपेवसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील सहाही जण भूमीगत झाल्याचे तपासात उजेडात आले आहे.विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील वरुण सतीशचंद्र शर्मा, अनिता सतिशचंद्र शर्मा, अश्विनी सतीशचंद्र शर्मा, सुरेंद्रकुमार रामचंद्र शर्मा, मालती सुरेंद्रकुमार शर्मा, प्रियंका सुरेंद्रकुमार शर्मा आपल्या राहत्या घरातून १५ आॅक्टोबर २०१७ रोजी बेपत्ता झाले होते. वरुण शर्मा यांची अमरावती येथे राहणारी पत्नी संगीत हिने २२ आॅक्टोबरला अमरावतीहून बेपत्ता झाल्याची आॅनलाईन तक्रार दिल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सहा जण बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.सून संगिता हिच्या आॅनलाईन तक्रारीवरून अर्नाळा सागरी पोलीस वरुण शर्माच्या घरी गेले असता घराला कुलुप होतो. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १५ आॅक्टोबरला पहाटे सहा जण एका कारमध्ये सामान टाकून निघून गेल्याचे दिसले होते.याप्रकरणाचा तपास पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, मंगेश चव्हाण, माया भोर, प्रशांत पाटील या पथकाकडे सोपवण्यात आला होता. वरुणने एकदा फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून पत्नी संगिताशी संपर्क साधला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुगलवरून वरुणचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला पुणे येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर वरुणच्या मदतीने उज्जैन मधून ताब्यात घेतले. सुरेंद्रकुमार शर्मा यांनी विरार येथील पाच ते सहा जणांकडून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र, त्या कर्जाची परतफेड न केल्याने पैसे देणाऱ्यांनी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अडचणीत सापडलेल्या शर्मा कुटुंबियांनी म्हणूनच विरार सोडून उज्जैन येथे पळ काढला होता.सुनेने केली तक्रारअमरावती येथे राहणारी संगिता बाळंतपणासाठी जून २०१७ रोजी आपल्या माहेरी गेली होती. तिने मुलाला जन्म दिल्यानंतर वरुण एकदा तिला भेटायलाही गेला होता. मात्र, आॅक्टोबर २०१७ पासून कुटुंबातील कुणाचाही संपर्क होत नसल्याने तिने आॅनलाईन तक्रार केली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार