शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा धड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:48 IST

व्हॉल्व्हमन करतात मनमानी; त्रास जनतेला

नालासोपारा : शहरात मागील ३ ते ४ दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्यामुळे हाल हाल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी साठा वसई विरार शहरात कमी दाबाने आणि थोड्या प्रमाणात पुरवला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला पाणी पुरत नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही ठिकाणी अवाच्यांसव्वा पैसे देवून टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रात घरपट १२० रु पये महिन्याला बिल दिले जाते. पाणी मिळो की न मिळो हे बिल महानगरपालिकेला भरावे लागते. हे बिल भरूनसुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. जेवढे दिवस पाणी मनपा देते तेवढेच बिल आकारावे, अशी लोकांत चर्चा आता जोर धरु लागली आहे.वसई तालुक्यात वाढती लोखसंख्या लक्षात घेता मनपाने सर्वच ठिकाणी सर्वे करून पाणी पुरवठा सुरळीत किंवा पाईप लाईन लागतील तर टाकल्या पाहिजेत अन्यथा उद्या पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.मनपा कमी पाणीपुरवठा करून या समस्येकडे जाणिवपूर्वक लक्ष देत नसून त्यामुळे बाटलीतील पाणी आणून ते प्यावे लागते आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे.व्हॉल्व्हमन पैसे कमावतातप्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी मनपाने व्हॉल्व्हमन ठेवले आहे. काही व्हॉल्व्हमन इमारतीकडून पैसे घेऊन जास्त पाणी सोडत आहे तर जी इमारत पैसे देत नाही त्यांना कमी पाणी सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर व्हॉल्व्हमन हे व्हॉल्व्हचे कमी आटे खोलत असल्यामुळे काही प्रभागात पाणी पुरवठा कमी दाबाने व अनियमित होत असल्याच्या अनेक तक्र ारी नगरसेवकांकडे रोज केल्या जात आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई