शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खडखडचे ठेकेदार आले जात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:39 IST

या धरणावर टप्प्या टप्याने झालेला खर्च मिळनू तो १३२ कोटींवर जावूनही गळती थांबत नसल्याने ठेकेदारांना जात्यात आले आहेत.

हुसेन मेमन।जव्हार : शहर व आसपासचा ग्रामिण भाग दरवर्षी पाण्याच्या टंचाईचा सामना करत असून यंदाची पाणीबाणी जास्त जाणवणारी आहे. या परिस्थितीमध्ये तालुक्यातील आधार असणाऱ्या खडखड डोमिहीरा धरण जागो जागी पाझरत असल्याने त्यावर खर्च झालेले ७३ कोटी मातीमोल झाले आहेत. त्यातच सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणावर टप्प्या टप्याने झालेला खर्च मिळनू तो १३२ कोटींवर जावूनही गळती थांबत नसल्याने ठेकेदारांना जात्यात आले आहेत.जव्हारमध्ये दरवर्षी विक्रमी पाऊस होता तरी आज ही तालुक्यातील आदीवासी पाड्यांवर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाई भासत असते. यामुळे शासनाकडून दरवर्षी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून विहिर, बंधारे, नळ-पाणी योजना तयार होत असतात. येथील खडखड या गावातील डोमिहीरा नावाने नदीवर आदीवासी उपाय योजने अंतर्गत २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने धरण बांधले.हा धरण २०१२ मध्ये ९५ टक्के पूर्ण झाले. मात्र, धरणाचे बांधकाम अनेक ठिकाणी निकृष्ट असल्याने तो पाझरु लागला. यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. याला जलसंपदा विभागाचे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्या संगमतानेच निकृष्ट काम करण्यात आलेले असल्याचा आरोपही येथील आदिवासी समाजाने केला आहे. तो पाझरत असल्यामुळे रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे.खडखड डॅम पासून ७ किमी अंतरावर असणाºया जव्हार शहराला या धरणातून १.२८ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र जव्हार नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे शहराला मंजूर पाणी आरक्षण रद्द करण्यात आले असल्याचे पत्र कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांनी प्रधान सचिव, जलसंपदा विभागाल, मंत्रालय मुबंई यांना कळविले आहे.या प्रकरणी कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. टी. प्रभाकर यांनी खडखड धरणाच्या निकृष्ट कामाला जबाबदार दोषी अधिकाºयावर कारवाई होणार आहे असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय त्याच्याकडून १३२ कोटी रुपये नुकसान भरपाई वसून केली जाणार असल्याचे सांगितले आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे, चौकशी अधिकारी कोकण भवन हे या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.चौकशी सुरु आहे...दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यासाठी प्रादेशिक चौकशी अधिकारी यांच्या यांच्या मार्फत चौकशी सुरू आहे.- आर. टी. प्रभाकर, कार्यकारी अभियंता,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे.सरकारचा १३२ कोटी रुपये खर्च पाण्यात गेला, २०१४ पासून चौकशी सुरू आहे. अजून दोषींवर कारवाई झालेली नाही. डॅम लीक नसता तर तालुक्याचं पाणी प्रश्न मिटला असता,वीज निर्मिती झाली असती.- पारस सहाणे, तक्रारकर्ता, जव्हार

टॅग्स :Damधरण