सहा तालुक्यांत शनिवारी नवीन रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 01:49 AM2021-01-10T01:49:49+5:302021-01-10T01:50:02+5:30

जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल : वसई-विरार परिसरातही रुग्णांमध्ये घट

There are no new patients on Saturday in six talukas | सहा तालुक्यांत शनिवारी नवीन रुग्ण नाही

सहा तालुक्यांत शनिवारी नवीन रुग्ण नाही

Next

जगदीश भोवड
 लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर  :  जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी केली जात असतानाच दुसरीकडे मात्र कोरोना संसर्गाची भीतीही आता हळूहळू कमी होताना दिसत आहे.  शनिवारी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये 
एकही नवीन रुग्ण आढळला नाही. यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. 
जिल्ह्यातील वसई-विरार आणि पालघर तालुका या दोनच परिसरामध्ये शनिवारी कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले. वसई-विरारमध्ये नवीन २२ रुग्ण  आढळले तर पालघर तालुक्यामध्ये केवळ तीनच रुग्ण  आढळले आहेत. उर्वरित डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, वाडा या तालुक्यांप्रमाणेच वसई ग्रामीणमध्येही एकही रुग्ण आढळला नाही. 

वसई-विरारमध्ये आजवर  एकूण २९ हजार ३८९ रुग्ण आढळलेले असून २८ हजार २७३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. मात्र त्याच वेळी ८९० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. परंतु आता वसई-विरार क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. शनिवारी नवीन २२ रुग्ण आढळले, तर २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आता पालिका हद्दीमध्ये केवळ २२६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 
दुसरीकडे पालघर जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांचीही कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. शुक्रवारी पालघर तालुक्यात तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पालघर तालुक्यात ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. डहाणूमध्ये शनिवारी नवीन एकही रुग्ण आढळला नसला तरी अद्याप ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. जव्हारमध्ये १०, मोखाडामध्ये १, तलासरीमध्ये ४, वसई ग्रामीणमध्ये १, विक्रमगडमध्ये १ आणि वाडामध्ये ७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.  बाधित रुग्णांची घटती संख्या आणि बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या लक्षात घेता लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्यामध्ये ४३ हजार रुग्णांची कोरोनावर मात
पालघर जिल्ह्यामध्ये आजवर ४३ हजार १७ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्यातील ३ लाख १२७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून शनिवारच्या अहवालानुसार अद्याप ९६१ जणांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. सध्या जिल्ह्यात केवळ ३५४ रुग्ण उपचार घेत आहेत. 

Web Title: There are no new patients on Saturday in six talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.