शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या अनेक मागण्या लागल्या मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:25 IST

आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता जव्हारच्या अनेक समस्या मार्गी लागल्या, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे यांनी दिली आहे.

- हुसेन मेमनजव्हार - आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता जव्हारच्या अनेक समस्या मार्गी लागल्या, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे यांनी दिली आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्याचे मुख्यालय पालघरला करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांना राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा आणि त्याने त्याचा विचार करावा, असे स्पष्ट केले होते. जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी यांसारख्या आदिवासी भागापासून नवीन पालघर जिल्ह्याचे मुख्यालय देखील दूर असल्याने गरीब आदिवासींची गैरसोय होऊ नये यासाठी याचीकाकर्त्यांच्या मागणीनुसार अपर जिल्हाधिकारी कार्यालय पूर्वीप्रमाणेच जव्हार येथे कायम ठेवण्याचा सरकारला निर्णय घ्यावा लागला होता.जिल्हा विभाजनापूर्वी जव्हारच्या अपर जिल्हाधिकारी यांना त्यांच्या अधिनस्थ पाच आदिवासी तालुक्यांपुरते जिल्हाधिकारी यांचे संपूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले होते. मात्र जिल्हा विभाजनानंतर अपर जिल्हाधिकारी यांना दिलेले जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात आल्याने जव्हारचे अपर जिल्हाधिकारी कार्यालय नाममात्र सुरू आहे. अपुरा कर्मचारी वृंद आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या मर्यादित अधिकारांमुळे सध्या हे कार्यालय ओस पडले आहे. जिल्हाधिकारी हे पालघर मुख्यालयात बसत असल्यामुळे दूरच्या तालुक्यांतील प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचा अंकुश राहत नाही आणि दुर्गम व आदिवासी भागांतील जनतेला विविध शासकीय कामांसाठी पालघर येथेच फेº्या माराव्या लागत आहेत.अ‍ॅड. राजाराम मुकणे यांनी आदिवासी भागाचा विकास, आरोग्य व कुपोषण आणि बेरोजगारी यांच्याशी निगडीत जनहिताच्या मागण्या मंजूर करण्यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘‘वर्षा’’ या निवासस्थानी एका शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ग्रामीण भागाच्या विकासाच्या मागण्यांची मोठी यादीच त्यांच्यासमोर मांडली. ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी आणि या भागांतील प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण रहावे यासाठी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून १५ दिवस जव्हार येथून कारभार चालवावा, जव्हारमध्ये पर्यटनाला खूप वाव असल्यामुळे या भागाच्या पर्यटन विकासास चालना मिळावी आणि सिव्हिल हॉस्पीटल जिल्ह्याच्याच ठिकाणी असावे हा ब्रिटीशकालीन निकष बदलून ते जव्हार येथे होणे गरजेचे असल्याचे या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांना अ‍ॅड. मुकणे यांनी पटवून दिले. हे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.लवकरच जीआर काढणारसरकार जनतेच्या विकासासाठी कटीबद्ध आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आणि जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून किमान १० दिवस जव्हारच्या मुख्यालयातून कामकाज चालविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ फोनवर चर्चा करून यासंबधी लवकरच जीआर काढू असे सांगितले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018newsबातम्या