शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिक्षण पंढरीमध्ये येणार मद्यपींचे लोंढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:36 IST

डहाणू ते झाई या किनारी भागात थोड्या अवधीतच मद्याची दुकानं वाढत आहेत.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू : डहाणू ते झाई या किनारी भागात थोड्या अवधीतच मद्याची दुकानं वाढत आहेत. येथे मिळणाऱ्या समुद्रातील माशांचे विविध पदार्थ आणि पाहिजे तो मद्याचा ब्रँड हाती मिळणार असल्याने थोड्या पैशात गोव्यासारखा अनुभव लुटता येणार असल्याने बार्डी परिसरात मद्य पर्यटनाला भरघोस पसंती मिळणार आहे. याचा सर्वाधिक फायदा लगतच्या गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने येथील तळीरामांना होणार असून हे लोंढे वाढणार आहेत.दमण आणि सेलव्हासा बनावटीच्या मद्याची आयातही बोर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या करिता स्थानिक बेरोजगारांना हाताशी धरून मद्य तस्करीला उधाण येईल. त्याचा थेट परिणाम वाढती व्यसनाधिनतेतून दिसणार आहेत. तर बाटलीच्या मागे बाईचा चंचूप्रवेश व्हायला वेळ लागणार नसून खुलेआम वेश्या व्यवसायही सर्वात महत्वाचे म्हणजे आचार्य भिसे विद्यानागरीत केजीपासून ते पीजीपर्यंत सुमारे आठहजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शिवाय हे शैक्षणिक संकुल अगदी समुद्रकिनाºयालगत असून या भागातच चौपाटी आहे. येथे मद्यपी पर्यटकांनी धुडघुस घातल्यास त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. कदाचित हा संभाव्य धोका लक्षात घेता, या शिक्षण पंढरीत विद्यार्थी पाठ फिरवण्याची शक्यता तज्ज्ञांनी लोकमतकडे बोलून दाखवली.बोर्डी परिसरात आजच्या घडीला चार बियरशॉप झाई किनाºयावर असून आगर (3), चिखले (2), बोर्डी आणि नरपड (1) असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयातून देण्यात आली. बार्डी ग्रामपंचायतीत नव्याने तीन बीयरशॉप व दोन परिमट रूमनां मंजुरी मिळाल्यानंतर हा चर्चेचा विषय ठरला आहे. तर घोलवड ग्रामपंचायती अंतर्गत एकही मद्याचे दुकान नाही. दोन वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांनी या विरोधात बंड पुकारल्याने या विळख्यापासून गाव मुक्त झाले.