शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

...त्यांची भटकंती दुष्काळाकडून दुष्काळाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:41 IST

भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास आहे...

- राहुल वाडेकरविक्रमगड : भटकंती करुन संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजातील एक कुटुंब सध्या येथील आलोंडा भागात वास्तव्यास असून औरंगाबाद येथील आपल्या गावी दुष्काळ असल्याने त्यांनी विक्रमगडची वाट धरली होती. मात्र या भागातही दुष्काळ पडल्याने त्यांच्या समस्या वाढल्या आहेत.वाढत्या महागाई व दुष्काळात कसा तग धरुन राहायचा व कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालू लागला आहे. आपली ही व्यथा प्रकाश भिका पवार व दिपक षिराले यांनी लोकमत कडे मांडली. ते सध्या रस्त्यावर आले झोपडे बांधुन वरवंटे, पाटे, उखळ आणि खलबंता विक्री करीत आहेत.आज या गावी तर उद्या त्या अशा जीवनशैैलीमुळे मुलांचे शिक्षण, स्वत:चे घर या गोष्टी तर या लोकांसाठी आज तरी स्वप्नवत आहेत़ मैलोन मैल प्रवासातच त्यांचे अर्धे आयुष्य संपते़. पण वाढत्या महागाईने व गेल्या काही दोन चार वर्षापासून पडलेला दुष्काळ व त्याची वाढत असेलल्या तिव्रतायामुळे यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यापैकी प्रकाश भिका पवार व त्याचें कुंंटुंब गेल्या एक महिनाभरापूर्वी विक्रमगड-आलोंडा शहरात रस्त्याच्या कडेला वास्तव्यास आले आहेत. त्यांनी औरंगाबाद ते आलोंडा असा खाजगी टेम्पो करुन त्यांनी आपल्या वरवंटे, पाटे, उखळ, आणि खलबंते घेऊन प्रवास केला आहे. त्यातच दगड, गाढव, आपले कुटुंब व घरातील सामान असे साहित्य येथे आणले आहेत. महिनाभरात त्यांनी बºयाच दगडी वस्तु बनविलेल्या आहेत व त्या विक्री करण्यास ठेवलेल्या आहे़ गावी दुष्काळ असल्याने ते या भागात आले आहेत. दरम्यान. येथेही दुष्काळ असल्याने त्यांच्या दगडी वस्तु विक्रीची मागणी खुप कमी झाली असल्याचे त्यांनी सांगीतले़हे कुंटुंब दगड फोडुन त्यातून वेगवेगळया वस्तु बनवून दारोदारी भटकत व आठवडा बाजारात त्या वस्तुंची विक्री करुन मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आलेले आहेत. ़हा आपल्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय असुन, आपण तो जोपासला असल्याचे सांगतात़ आज तरी आधुनिक युगात लोक वावरत असले तरी विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा ग्रामीण परिसर असलेल्या तालुक्यांत भागात दगडी वस्तुना मागणी आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी रोजीरोटीसाठी तहान, भूक आदी न बघता पोटासाठी दोन घास मिळावे यासाठी दिवसभर दगड फोडण्याचे काम करावे लागते. दगड फोडतांना त्याचा कस डोळयात अनेकवेळा उडतो कधी कधी त्याचा कचरा मार लागुन डोळा जाण्याचा संभाव असतो. मात्र आता हे आमचे रोजचेच असल्याने तेवढी दक्षता आम्हांस घ्यावी लागते व दुर्लक्षही करावे लागते असे पवार सांगतात.दगडापासून जाते, पाटे, कुंडी, दिवा, कुंभई, भुताळ अशा विविध वस्तू बनवून भटंकती करावी लागते ़त्याचप्रमाणे आठवडा बाजारात या वस्तु विकण्यासाठी बसावे लागते़ या वस्तु दगडाच्या असल्याने ग्राहक त्या एकदाच खरेदी करतो, वारंवार घ्याव्या लागत नाहीत़ त्यामुळे रोजच पैसा मिळेल, याची खात्री नसते़ परंतु गेल्या दोन वर्षापासूनच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे दिवसेंदिवस या वस्तुंची मागणी घटली आहे़ तर त्यांनी या उद्योगाबाबत समाधान व्यक्त केले.>आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही ग्रामिण भागात हाताच्या कलेलाही तेवढीच मागणी आहे़ आजचा बाजार भाव वाढत आहे़ वस्तु बनविण्याचा खर्चही जास्त येत असल्याने वस्तुंच्या किंमतीही वाढल्या असल्याचे प्रकाष पवार सांगतात़ त्याप्रमाणे जाते - १००. ते ८००, पाटा-५०० ते ६००, कुंडी-३०० ते ४००,दिवा-२०० ते ३००,खलबत्ता ४०० रुपयांना या वस्तू विकल्या जातात़ परंतु तुटपुज्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने उपाशीपोटी दिवस काढावे लागतात़ पावसाळा तर नुसता बसून घालवावा लागतो अशी खंत पवार यांनी व्यक्त केली़