शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

वसईत घरावर दरड कोसळून बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; २ जण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:41 IST

सदर घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. 

मंगेश कराळे

नालासोपारा - वसईच्या राजावली येथील वाघराळपाड्यात बुधवारी सकाळी एका घरावर दरड कोसळलेल्या दुर्घटनेत बाप व लेकीचा।दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) असे मृत्यू झालेल्या दोघांचे नाव आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनसाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या दोघांचा मृत्यू झाल्याचे पालघर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

सदर घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. वसईच्या राजावली परिसरातील वाघराळपाडा येथे बुधवारी सकाळी दरड कोसळण्याची घटना घडली.  या दुर्घटनेच्या ठिकाणाखाली चारजण गाडले गेली असल्याची माहिती समोर आली होती. स्थानिक पोलीस व वस‌ई विरार महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनांस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यावेळी दोन जणांना वाचवण्यात यश आले असून ढिगा-याखाली दोन जण अडकल्याची माहिती होती. मुसळधार पाऊस व परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे जेसीबी घटनास्थळी असे पोहोचू शकत नसल्याने मदत कार्यात अडथळा येत असल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती.

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात बुधवारी दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. या दरडीखाली एक घर दाबले गेलेले आहे व त्यात वडील व मुलगी अडकल्याची शंका होती. अखेर अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) या दोन्ही बाप-लेकीचा  ढिगा-याखाली अडकून मृत्यू झाला आहे. तर वंदना अमित ठाकूर (३३) व ओम अमित ठाकूर (१०) या आई व मुलाला वाचवण्यात यश आले आहे.