शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या कांद्याने आणले पुन्हा डोळ्यांत पाणी; सलग दुसऱ्या वर्षी कर्जाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 23:08 IST

सलग दुसऱ्या वर्षी कर्जाचा डोंगर

वसंत भोईरवाडा : रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा तयार होऊन बाजारात येणार तोच पुन्हा लाॅकडॉऊन झाल्यामुळे घरातच पडून राहिल्याने शेतकरी चिंतित आहेत. उत्पादनासाठी केलेला खर्चही न निघाल्याने लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर डोक्यावर चढल्याने सलग दोन वर्षे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी  आणले आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. भातानंतर  येथील शेतकरी कडधान्य, भाजीपाला, फळ, फुलांऱ्या शेतीत नवनवीन प्रयोग करू पाहात आहेत.  निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील शेती तोट्यात चाललेली आहे. त्यात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीच्या आजाराचे संकट सुरू झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. 

पूर्वी एकमेव भाताचे पीक घेतले जात होते. आता मात्र पांढऱ्या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी पांढरा कांद्याची शेती करू लागले आहेत. चांबले, डाकिवली, केळठण, बुधावली, देवघर, कुडूस, निचोळे, गातेस, चिखला, नेहरोली, सांगे, नाणे या गावांत पांढऱ्या  कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

कांद्याला शेणखत, दाणेदार, १८.१८.१८.अशी खते दिली जातात. एका एकराला अंदाजे ७५ हजारांचा खर्च येतो. यातून दीड लाख रुपये मिळतील अशी आशा निचोळे येथील प्रयोगशील शेतकरी सतीश पष्टे यांना वाटत होती.  गेल्या वर्षीचे सर्व काही विसरून पुन्हा नव्या उमेदीने पांढऱ्या कांद्याची लागवड मोठ्या आशेने केली.  पीकही बहरून आले, मात्र पुन्हा लाॅकडॉऊन झाल्यामुळे तयार झालेला कांदा घरीच पडून राहिल्याने येथील बळीराजाच्या डोक्यावर कर्जाचा  डोंगर चढल्याने तो पार मेटाकुटीस आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारonionकांदा