शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक देणार रिकाम्या पोत्यांचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:34 IST

नाराजीचा सूर : २०१२ पासूनची माहिती कशी देणार? विक्री केली नसल्याचे कारण पुढे

अनिरुद्ध पाटील ।बोर्डी : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदळाच्या रिकाम्या पोत्यांची विक्री करून प्राप्त होणारी रक्कम चलनाने शासनास जमा करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना प्राप्त झाला आहे. या निर्णया विरु द्ध तीव्र पडसाद शिक्षकांमध्ये उमटले असून नाराजी व्यक्त होत आहे.सर्व शिक्षा अभियानातून शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि अनुदानित माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनात खिचडी दिली जाते. या करिता येणारे तांदूळ पोत्यातून शाळेपर्यंत पोहचतात. २०१२ ते २०१८ या काळातील तांदळांची पोती विकून आलेला पैसा शासन दरबारी जमा करण्याचे फर्मानच संचालक सुनील चौहाण यांच्या सही-शिक्क्याने बजावण्यात आले आहे. परंतु चालू शैक्षणिक वर्ष वगळता उर्वरित पाच वर्षातील पोत्यांचे पैसे कसे अदा करायचे असे प्रश्न शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे.पालघर जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडतो. जून ते आॅगस्ट या महिन्यात पावसाचे प्रमाणही अधिक असते. या काळात वर्ग खोल्यांच्या लाद्या ओल्या असतात. शिवाय विद्यार्थ्यांची बसायच्या बेंच-डेस्कवरही ओलावा येतो. ते पुसण्याकरीता सर्रास पोत्यांचा वापर केला जातो. शिवाय दमटपणा वाढल्याने जमा केलेल्या पोत्यांना बुरशी लागून ती कुजून खराब होतात. महत्वाची बाब म्हणजे पोती खरेदी करण्याचे दर वेगवेगळ्या भागात भिन्न असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्याकरिता बहुतेक शाळांकडून त्यांची विक्र ीच केली जात नसल्याची मतं शिक्षकांनी मांडली आहेत.दरम्यान या निर्णयामुळे सहा वर्षांतील रिकामी पोती आणि ती विकून आलेल्या पैशांचा हिशोब शाळेला द्यावा लागणार आहे. त्यामुळे विकले न गेलेल्या पोत्यांचे पैसे आणायचे कुठून या समस्येने शिक्षकांना ग्रासले आहे. तथापि मनस्ताप देणाºया निर्णया विरोधातील सूर तीव्र झाला असून तो तत्काळ मागे घेण्याच्या मागणीने जोर धरला आहे.शासनाने शिक्षकाला बांधकाम करणारा, माणसं, जनावरं मोजणारा, बाजारातील वस्तू खरेदी करणारा, लोकांचे आधार कार्ड, बँक खाती उघडून देणारा क्लार्क व आचारी बनवलेच होते. आता चक्क भंगारवालाच केलं आहे. हा निर्णय खच्चीकरण करणारा व हास्यास्पद आहे. तो तत्काळ मागे घ्यावा. मध्यान्ह भोजन योजना त्रयस्थ संस्थेकडे देण्याची वेळ आली आहे.- विठ्ठल ठाणगे, अध्यक्ष, शिक्षक सेना, डहाणूया निर्णयाविरोधात शिक्षकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिक्षक प्रतिनिधींच्या माध्यमातून त्या लिखित स्वरूपात आमच्यापर्यंत पोहचल्यास शासनापर्यंत पोहचिवण्यात येतील.- निलेश गंधे, सभापती, शिक्षण विभाग, पालघर जि.प.

टॅग्स :Teacherशिक्षक