शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तलासरी पं. समितीवर माकपची सरशी, भाजपला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 01:16 IST

तलासरी पंचायत समितीच्या १० जागांपैकी ८ जागा व जिल्हा परिषदेच्या ५ जागांपैकी ४ जागा जिंकून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

सुरेश काटे तलासरी : तलासरी पंचायत समितीच्या १० जागांपैकी ८ जागा व जिल्हा परिषदेच्या ५ जागांपैकी ४ जागा जिंकून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. भाजपला मागील निवडणुकीतील त्यांच्या विजयी जागा राखता न आल्याने मोदीलाट ओसरल्याचे दाखवून दिले. भाजप जि.प.च्या १ गटात, पंचायत समितीच्या २ गणातच विजय मिळवता आला.तलासरी तालुका हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला आहे. मात्र मागच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने मोदी-लाटेच्या जोरावर तलासरीतील जिल्हा परिषदेच्या पाचपैकी तीन जागा व पंचायत गणाच्या दहापैकी चार जागा जिंकल्या होत्या आणि अपक्षाच्या मदतीने पंचायत समितीचे उपसभापतीपद पटकावले होते. नंतर मात्र अपक्ष संगीता ओझरे या पुन्हा स्वगृही माकपात गेल्याने पंचायत समितीवर माकपचे सभापती व उपसभापती निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू विधानसभेची आपली गेलेली आमदारकीची जागा परत मिळवल्याने माकप कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर करून कार्यकर्ते जोमाने कामाला लागून त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निर्विवाद बहुमत मिळविले. दरम्यान, या निवडणुकीत भाजपला अंतर्गत बंडाळी, असंतोष आणि जिल्हा अध्यक्षाबाबत असलेली नाराजी याचा फटका बसला. या उलट माकप तळागाळात जाऊन मतदाराना भेटली. या निवडणुकीत माकप विरुद्ध भाजप अशीच लढत होती. माकप व भाजपबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, बहुजन विकास आघाडी हेही पक्ष निवडणुकीत ताकदीने उतरले होते, परंतु त्यांना साधे खातेही उघडता आले नाही. मंगळवारी मतदान होऊन बुधवारी सकाळी तलासरी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. या वेळी तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.। या वेळी तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माकपचे कार्यकर्ते बहुमताने निवडून येऊ लागले तसतशी तहसील बाहेर गर्दी वाढू लागली. मतमोजणीवेळी तलासरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीवर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी व पोलीस निरीक्षक अजय वसावे लक्ष ठेवून होते.>तलासरी जिल्हा परिषद गटात विजयी झालेले उमेदवार१) अनिल रमण झरिवा- मते ५२६४, माकप, उपलात गट२) शेलू जितेश कुºहाडा- मते ४१७२, पक्ष भाजप, सुत्रकार गट३) विजय नवश्या उराडे- मते ४८०५, पक्ष माकप, डोंगारी गट४) रामू भादल पागी- मते ४९४०, पक्ष माकप, झाई गट५) अक्षय प्रवीण दवणेकर- मते ६०८६, पक्ष माकप, उधवा गट>तलासरी पंचायत गणात विजयी उमेदवार१) राजेश दिवाळ खरपडे, मते २३२२, माकप, उपलात गण२) संतोष पासकल खटाळे, मते २५२९, माकप, कोचाई गण३) शरद चैत्या उंबरसडा, मते १७६६ माकप, सूत्रकार गण४) पूजा विजय खरपडे, मते २१७४, भाजप, झरी गण५) नम्रता मिटेश धोडी, मते ३३११ माकप, डोंगारी गण६) जयवंती लक्ष्मण घोरखाना, मते ३५१७ भाजप, गिरगाव गण७) सुनीता जयेश शिंगडा, मते २०९९, माकप, झाई गण८) भरत रामू कडू, मते २८४२, माकप, वसा गण९) संगीता माधव ओझरे, मते २५१७ माकप, वडवली गण१०) नंदकुमार वनश्या हडळ, मते १९४५, माकप उधवा गण