शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

भरती परीक्षा पोर्टलऐवजी समितीमार्फत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:21 IST

नोकर भरती परीक्षा आॅफलाईन पद्धतीने जिल्हा निवड समिती मार्फत घेण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना निवेदन देऊन केली आहे.

वाडा : सरकारी सेवेतील कर्मचारी भरतीसाठी चालविले जाणारे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात यावे व सर्व नोकर भरती परीक्षा आॅफलाईन पद्धतीने जिल्हा निवड समिती मार्फत घेण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना निवेदन देऊन केली आहे.या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रचंड अव्यवस्था, गलथानपणा आणि अपारदर्शकता आढळून आली आहे. त्यामुळे लाखो तरु णांचे भवितव्य अंधारात लोटले जात आहे. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बैठक क्रमांकानुसार बसविले जात नाही. परिणामी सामूहिक कॉपीला प्रोत्साहन मिळते. सेक्शनल आणि कट आॅफ नॉर्मलायझेशन या पध्दतीचा अभाव पोर्टलवर दिसून येतो.परीक्षेची वेळ संपल्यावरही फएछडॠकठ होणे. त्यामुळे परीक्षा झाल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कमी व जास्त करता येऊ शकतात. इतर स्पर्धा परिक्षांनमधे विद्यार्थ्यांस वैयक्तिक उत्तरिपत्रका (रीस्पांन्स शिट) देते. पण, पोर्टलची ही पध्दत नसल्याने हा कारभार पारदर्शी नसल्याच्या तक्र ारी वाढू लागल्या आहेत.आगामी काळात ७२ हजार जागांची मेगा भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणार आहे. ती अशाच प्रकारे झाली तर राज्यातील तरु णांचे भविष्य धोक्यात येईल. हे पोर्टल रद्द करून सर्व परीक्षा आॅफलाइन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.महापोर्टल द्वारे अनेक परीक्षात गोंधळ कृषी सेवक, महाबीज, अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा या कंपनीने परीक्षेचे तिन तेरा वाजवले आहेत. एका प्रश्नपत्रिकेत चक्क सैराट व मुंबई ङ्क्त पुणे मुंबई या चित्रपटाच्या अभिनेत्रींचे नाव विचारल्याचे समोर आले आहे.प्रश्नपत्रिकेत गोंधळ असताना तांत्रिक व शैक्षणिक बाबतीतही या महापोर्टलने अजब गोंधळ उडवून दिलेले आहेत. त्यामुळे हे पोर्टल बंद करून परीक्षा आॅफलाईन घेण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री विष्णु सवरा यांच्याकडे करण्यात आली.।कृषीसेवक, महाबीज, अन्न व नागरी पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगर परिषद व नगरपंचायत या परीक्षेत मोठा गोंधळ घातला असून याचा फटका स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करून नोकरभरती परीक्षा आॅफलाइन घेण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे.- अमोल सांबरे, उपाध्यक्ष, पदविकाधारक संघर्ष समिती।महापरीक्षा पोर्टल शासनाने त्वरीत बंद करावे व परीक्षा पारदर्शक पद्धतीने आॅफलाईन घेण्यात याव्यात अन्यथा स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना सोबत घेऊन महापरीक्षा पोर्टल विरोधात आंदोलन तीव्र करू.राहुल पाटीलपालघर जिल्हाअध्यक्ष,>मागील परीक्षेमध्ये झालेला गोंधळ काय आहेत पोर्टलविरोधात तक्र ारीपरीक्षेची वेळ संपल्यावरही फएछडॠकठ होणे. त्यामुळे परीक्षा झाल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कमी व जास्त करता येऊ शकतात.परीक्षा केंद्रावर बैठक व्यावस्था जवळ जवळ असल्याने सामुहिक कॉपी प्रकार काही सेन्टरवर घडत आहेत.परीक्षा केंद्र सुविधा नसलेले होते, विद्यार्थी संख्येनुसार संगणक नसणे, संगणक मध्येच बंद पडणे, खाजगी केंद्रावर परीक्षा घेणे.परीक्षा झाल्यावर उत्तर पत्रिका (रीस्पांन्सशिट) न देणे मागणी करून ही देण्यास टाळाटाळ करणे.नॉर्मलायाझेशन न करणे, किवा कोणत्याही प्रकारची दर्जेदार प्रक्रि या नसणे.चुकीचे प्रश्न विचाराने व तक्र ार केल्यास दखल न घेणे.विदार्थ्यांच्या उत्तर पत्रिका अ‍ॅटोमॅटिकली सिस्टीम जनरेटेड नसणे.बैठक व्यवस्था पुरेशी नसल्याने एकच पेपर वेगवेगळ्या वेळेत घेतल्याने प्रश्निपत्रका फुटीचे प्रकार घडतात.उत्तर पित्रकेतील प्रश्न क्र मांक बदलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.