शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ताब्यात घ्या; सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:52 IST

करारानंतर सात दिवसात रूग्णालय सरकारने चालवण्यास घ्यावे अशी अट असताना सरकारनेच अटीचे उल्लंघन करत अद्यापही रूग्णालय चालवण्यास घेतलेले नाही.

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेने पंडित भीमसेन जोशी रूग्णालय सरकारला हस्तांतरीत करण्याचा करारनामा करून तीन महिने झाले. करारानंतर सात दिवसात रूग्णालय सरकारने चालवण्यास घ्यावे अशी अट असताना सरकारनेच अटीचे उल्लंघन करत अद्यापही रूग्णालय चालवण्यास घेतलेले नाही. त्यामुळे आयुक्तांनी सरकारला पत्र पाठवून रूग्णालय पूर्णपणे ताब्यात घेऊन चालवण्याची विनंती केली आहे.गोरगरीबांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून तत्कालिन नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या दट्यानंतर पालिकेने चार मजली इमारत बांधून २०० खाटांचे रुग्णालय सुरू केले. परंतु रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रणाच सुरू केल्या नाहीत. चांगले डॉक्टर तसेच आवश्यक कर्मचारीही नेमले नाही. भाजपा - शिवसेनेने मोठ्या थाटात उद्घाटन करुन राजकीय श्रेय लाटले. पण सामान्यांवर नीट उपचार होत नसल्याने सातत्याने टीका होत होती.नुकतेच रूग्णालयात उपचारासाठी दाखल पाच रूग्णांच्या मृत्यूनंतर पालिका वादात सापडली. सरकारने अहवाल मागवताच आयुक्तांनीही थातूरमातूर दिला. २४ मे रोजी पालिका व सरकारमध्ये करार झाला. करारानंतर सात दिवसात रूग्णालय सरकारने ताब्यात घेऊन चालवायचे होते. परंतु करार होऊन तीन महिने झालेतरी सरकारने रूग्णालय ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आरोग्य विभागास पत्र देऊन रूग्णालय ताब्यात घ्यावे अशी विनंती केली आहे.काही गोष्टी प्रलंबितसरकारचे काही डॉक्टर व कर्मचारी हजर झाले असून काही अधिकारी नेमणे तसेच स्वतंत्र बँंक खाते उघडणे प्रलंबित असल्याचे कारण यामागे असल्याचे कारण सांगितले जात आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmira roadमीरा रोड