शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सेवगा गडाने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:14 IST

पालघर जिल्ह्यातील विविध चार संघटनेचे ५५ तरुण सहभागी

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्यातील करंजवीरा जवळील सेवगा गडाचे संवर्धनासाठी पालघर जिल्ह्यातील चार विविध संघटनेतील दुर्गमित्रांनी एकत्र येऊन मोहीम राबविली. गत दीडशे वर्षांपासून व्यवस्थे आभावी जिर्णता आलेल्या या शिवकालिन गडावर राबविलेली ही आठवी मोहिम असून यावेळी माती खाली गाडल्या गेलेल्या पाण्याच्या टाक्या व त्यांचे झरे मोकळे करण्यात आले.डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गलगत करंजवीरा जवळ हा प्राचीन शिव कालीन किल्ला आहे. तेथे जाण्यासाठी आंबोली व ओसरविरा गावा जवळून जाण्यासाठी रस्ता आहे. दीड ते दोन किमी अंतर पार करत एक ते दीड तासाने गडावर जाता येते. गडावर शिवकालीन शिवमंदिर आहे. परिसरातील नागरिक दर नारळी पौर्णिमेला तेथे मोठया प्रमाणावर पूजेसाठी जातात.किल्ले वसई मोहीम परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, स्वामी समर्थ केंद्र सफाळे, समस्त दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र या चार दुर्गसंवर्धक संस्थानीं एकत्र येत सेवगागड प्राचीन टाक्या (कुंड) स्वच्छता मोहीम राबविली. ही मोहिमेत विरार नायगाव वसई सफाळे, पालघर व डहाणू भागातील एकूण ५५ दुर्गमित्र सहभागी झालेले होते. या ठिकाणी एकूण सात टाके (कुंड) असून दुर्गमित्रांनी प्राचीन अनघड टाके (कुंड) व वनस्पती टाके (कुंड) संवर्धनासाठी श्रमदान केले.या मोहिमेची सुरुवातील दुर्गमित्रांनी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांचे मार्गदर्शन घेतले. यात प्राचीन टाके, शिवकालीन बालेकिल्ला व्यवस्था, आज्ञापत्र व दुर्गबांधणी, माची दरवाजा, मुख्य महादरवाजा मार्ग, माची बुरु ज, श्री शिवमंदिर, श्री हनुमान मंदिर आदी स्थळांवर राऊत यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुर्गिमत्रांनी बालेकिल्ला बुरु जाच्या खालील अंगास असणाऱ्या अनघड टाके स्वच्छता मोहिमेत ५००० हुन अधिक घमेली मातीचा गाळ, चिखल, दगड कुंडातून बाहेर काढला.ही अनघड टाके (कुंड) गेली किमान १५० वर्ष मातीच्या गाळाखाली बंदीस्त होत आलेली होती. दुर्गमित्रांनी गडाचे अस्तित्व राखण्याच्या उद्देशाने व गडावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी चिकाटीने श्रमदान केले. या मोहिमेतील गाळात कोणतेही ऐतिहासिक अवशेष प्राप्त झाले नाहीत. या टाक्यांची (कुंडाची) पाण्याची क्षमता सुमारे ४० हजार लीटर इतकी आहे. श्रमदानाच्या दुसºया सत्रात दुर्गमित्रांनी आणखी एक वनस्पती टाके (कुंड) स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.गडाच्या संवर्धनासाठी ही आठवी मोहिमही मोहिम राबवित असताना दुर्गमित्रांनी गडावर काही फळझाडांचे रोपण केले. आजच्या संवर्धन मोहिमेचे नेतृत्व आतिष पाटील व जयदीप चौधरी यांनी केले. अपरिचित सेवगा गडाच्या संवर्धनासाठी ही आठवी मोहीम होती.यावेळी पालघर जिल्ह्यातील दुर्गसंवर्धन व अभ्यास मोहिमेत गेली १५ वर्ष सातत्याने योगदान देणाºया किल्ले वसई मोहीम परिवार व सिद्देश गजानन म्हात्रे परिवाराचा युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर अंतर्गत सत्कार करण्यात आला.या मोहिमेसाठी स्थानिक दर्गमित्र व शिवसेना तालुका प्रमुख संतोष वझे यांनी सकाळचा अल्पोपहार व वृक्षारोपणासाठी झाडे उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता स्वराज्याच्या वीरांना मानवंदना देऊन करण्यात आले.

टॅग्स :FortगडVasai Virarवसई विरार