शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

तारापूर अणुकेंद्रातील नोकरभरतीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:11 IST

भरतीला स्थगिती देण्याचे आश्वासन एनपीसीआयएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार शर्मा यांनी खासदार राजेंद्र गवितांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत दिले.

- पंकज राऊत बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधील नोकर भरतीच्या परीक्षेच्या प्रक्रियेवरून तारापूरचे प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांचा संतप्त जमाव रस्त्यावर उतरून व्यक्त केलेल्या संतापाची दखल घेऊन अखेर या भरतीला स्थगिती देण्याचे आश्वासन एनपीसीआयएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार शर्मा यांनी खासदार राजेंद्र गवितांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत दिले.शर्मा यांच्या बरोबर मुंबई येथील अणुशक्ती नगरच्या दालनात नुकतीच खासदार राजेंद्र गवितांनी बैठक घेऊन तृतीय श्रेणीतील कामगार भरतीत स्थानिक प्रकल्प बाधित विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी केली.या वेळी ह्यूमन रिसोर्स विभागाचे डायरेक्टर नागाची, भाजपाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र राऊळ, भाजपाचे पालघर तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर यांचेसह आंदोलक विद्यार्थी, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.शासनाच्या ८० टक्के भूमीपुत्राना नोकरीत संधी या धोरणानुसार ८० टक्के नोकºया ह्या विस्थापित झालेले आहेत त्यांनाच देऊन नोकर भरतीच्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकामध्ये वैकल्पिक भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर करून सध्याची भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया राबवावी अशी खंबीर भूमिका खासदार गावित यांनी बैठकीत घेतली. या बैठकीत सर्व विषयावर सकारात्मक चर्चा होऊनसंबधित सर्व मागण्या केंद्र सरकार कडे पाठऊन त्याचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालक शर्मा यांनी देऊन भरती प्रक्रियेला सध्यास्थगिती देऊन सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने गावितांच्या मध्यस्थीला चांगले यश आले आहे .>अखेर भूमिपुत्र व आंदोलकांना न्याय मिळालाअणुऊर्जा केंद्रातील कर्मचाºयांना घेऊन जाणाºया बस पाचमार्ग नाक्यावर अडवून त्याची तोडफोड करून सुमारे १० तास अणुकेंद्राचा रस्ता दि ४ रोजी रोखून धरला होता त्या वेळी खासदार राजेंद्र गावित व आमदार अमित घोडा यांच्या नेतृत्वाखाली तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या स्थानिक अधिकाºयांबरोबर वेगवेगळ्या बैठका होऊन तात्पुरता तोडगा काढल्या नंतर संतप्त आंदोलनकांनी संध्याकाळी आंदोलन मागे घेतले होते.दरम्यानच्या काळात खासदार गवितांनी प्रकल्पग्रस्त व आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांवर नोकर भरती बाबत अणुऊर्जा प्रशासना कडून होणारा अन्याय थांबवून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी तारापूर प्रकल्प पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.