शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मेमु न थांबवणारा मोटरमन निलंबित,उमरोलीतील प्रकार, प्रवाशांचा संताप अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:32 IST

पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

- हितेन नाईकपालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान डहाणू रेल्वे स्थानकातून सुटलेली पनवेल मेमु ही ५:५५ मिनिटांनी नियमित वेळेनुसार उंमरोळी स्थानकात येणार असल्याने शेकडो विद्यार्थी, चाकरमानी, छोटे व्यावसायिक आदी वाट पहात होते. मात्र ही गाडी न थांबताच पुढे निघून गेली. आणि प्रवाशांचा एकच कल्लोळ सुरू झाला. मेमु गाडीचे गार्ड बिपीन पटेल ह्यांनी घेतलेला इमर्जन्सी ब्रेक आणि त्याचवेळी प्रवाशांनी ही चेन पुलिंग केल्याने सदर गाडी उमरोली स्थानका पासून सुमारे 1 किमी लांब पेट्रोल पंपा जवळ थांबली. आणि काही वेळाने पालघर कडे मार्गस्थ झाली.मेमु पुढे निघून गेल्याचे समजताच उमरोली गावातून शेकडो ग्रामस्थ स्टेशनवर जमा झाले. ह्यावेळी डहाणू हुन मुंबई कडे जाणारी अंधेरी लोकल प्रवाशां सह स्थानिकांनी काही काळ रोखून धरत आंदोलन केले. उंमरोळी रेल्वे स्थानक प्रशासनाने या बद्दल प्रवाश्याकडे दिलिगरी व्यक्त केल्याने प्रवाश्याना तूर्तास आंदोलन मागे घेतले. ही मेमु गाडी चुकल्याने अनेक चाकरमान्यांना रोजगाराचा तर विद्यार्थ्यांची शाळा चुकल्याचे त्यांना त्याचा फटका बसला आहे.या घटने नंतर डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी, उपाध्यक्ष महेश पाटील, सहसचिव प्रथमेश प्रभूतेंडोलकर, उमरोली सरपंच पाटील, अनिल तरे आदींनी पालघर रेल्वे स्थानकात जाऊन स्टेशन प्रबंधक सी. एच. कोहली ह्यांची भेट घेत त्यांच्या कडे तक्र ार केली आहे. दरम्यान, प्रवासी सेवा संघटनेने पश्चिम रेल्वेचे डीआरएम मुकुल जैन ह्याच्या कडे सोशल मीडिया वरून तक्र ार केल्यानंतर मेमु गाडी वसई स्टेशनला थांबल्यानंतर मोटरमन प्रशांत जेना ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करताना त्याच्या कडून गाडीचा ताबा काढून घेत त्यांना निलंबित केल्याचा मेसेज आला. त्याला स्टेशन प्रबंधक कोहली ह्यांनीही दुजोरा दिला आहे.प्रवाशांची फसवणूकउमरोळी रेल्वे स्टेशन ची उभारणी २८ मे २००० साली करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने वैतरणा ते डहाणू पर्यंतच्या भागाला उपनगरीय रेल्वेचा दर्जा बहाल केला असून मोठ्या प्रमाणात उपनगरीय कर वसूल केला जात आहे.रेल्वे अ‍ॅक्ट नुसार उमरोळी स्टेशन मधून वर्षाकाठी १२ लाख ५० हजाराचे उत्पन्न आणि महिन्याला ४४ हजाराचा उपनगरीय कर वसूल केला जात असताना ह्या स्टेशन मध्ये रेल्वे प्रशासनाने एकही अधिकृत अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केलेली नाही.ह्या स्टेशन मधून सर्व स्टेशनची तिकिटे मिळण्याची व्यवस्था आणि युटीएस सिस्टिम आदी सुविधा उपलब्ध करून दिली जात नाहित. परिणामी इथल्या प्रवाश्यांना ५ ते ६ किमीचे अंतर कापून एकतर बोईसर अथवा पालघर स्टेशन गाठावे लागत आहे.शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सोयीसुविधा बाबत तर बोंब असून अनेक तक्र ारी करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याचे उमरोळीचे अनिल तरे ह्यांनी सांगितले. नियमानुसार ह्या स्टेशन ला ‘सी’ दर्जा बहाल तशा सुविधा दिल्या जात नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार