शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:18 IST

विक्रमगड : तालुक्यातील झडपोली येथील शासकीय तंत्रिनकेतन मधील अजय लाटे या १८ वर्षीय विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यातील झडपोली येथील शासकीय तंत्रिनकेतन मधील अजय लाटे या १८ वर्षीय विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मॅकेनिकल पदविकेच्या दुसºया वर्षाला असणारा अजय लाटे हा शहापूर तालुक्यातील आपटे या गावाचा रहिवासी होता. शिक्षणासाठी मागील वर्षापासून तो झडपोली येथील कॉलेजच्या बाजूलाच खोली भाड्याने घेऊन मित्रांबरोबर राहत होता. तो अभ्यासात अतिशय हुशार होता. १०वी मध्ये ९१ टक्के मार्क मिळविणाºया अजयने मॅकेनिकलच्या डिप्लोमाला विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला होता.प्रथम वर्षात त्याने ८२ टक्के माकर्समिळवून तो अव्वलही आला होता. सध्या परीक्षा चालू असल्याने तो रूमच्या बाजूला असलेल्या परिसरात अभ्यासासाठी गेला होता. त्यानंतर तो रूममध्ये येऊन झोपल्यानंतर खूप त्रास होऊ लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याला त्वरीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्याने १०८च्या अ‍ॅम्ब्युलन्सने त्याला ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.अभ्यासात अतिशय हुशार असणाºया अजयने विष प्राशन करून आपले जीवन संपविण्या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपासून तो थोडा एकटा-एकटा राहत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. वयात येणाºया मुलांच्या आत्महत्येच्या अशा घटनेने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.>त्याला चांगले गुण मिळाले असल्याने त्याच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरणाचे कारण असावे काय? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. परंतु अद्याप त्यादृष्टीने कोणतेही धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाही.