शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टँकर लॉबीला सुगीचे दिवस, प्रशासन पुन्हा ठरले अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:30 IST

वाढती लोकसंख्या, वसई-विरार महानगरपालिकेच्या मर्यादा आणि यंदा परतीच्या पावसाने दिलेला दगा वसई तालुक्यातील टॅँकर लॉबीसाठी सुगीचे दिवस आणणारा ठरला आहे.

- सुनिल घरतपारोळ : वाढती लोकसंख्या, वसई-विरार महानगरपालिकेच्या मर्यादा आणि यंदा परतीच्या पावसाने दिलेला दगा वसई तालुक्यातील टॅँकर लॉबीसाठी सुगीचे दिवस आणणारा ठरला आहे. एकीकडे वसईतुन टॅँकर हद्दपार झाल्याचे दावे सुरु असताना डिसेंबर महिन्यापासूनच त्यांनी धावपळ दिसू लागल्याने अपघातांचे प्रमाणही वाढणार असल्याची भिती निमिण झाली आहे.गोखीवरे, वालीव, पेल्हार, कोपर, उसगाव, शिवनसई, खानिवडे, चंदनसार, भाटपाडा, विरार पूर्वेकडील फुलपाडा या भागातील विहीर आणि बोअरवेलमधून हे टँकर पाणी भरतात. खाजगी विहीर आणि बोअरवेल मालक पैशासाठी बेसुमार पाणी उपसा करु लागल्याने या भागातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत विहिरीतील पाणी पुरेल का? या भीतीने, गावकरी चिंतेत आहेत.हे व्यवसायिक टॅँकर पैसा कमावण्याच्या उद्देशाने मिळेल तिथून पाणी भरून नागरिकांना विकतात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रि या केली जात नसल्याने दूषित पाणी पिण्याशिवाय लोकांना पर्याय नसते. पावसाळा ते फेब्रुवारीपर्यंत टँकरचे दर ९०० ते १२०० रु पये असतात. आता टँकरचे दर वाढू लागले असून ही किंमत १५०० रुपयांवर पोहचली आहे. जसजशी पाणी टंचाईची झळ वाढायला सुरु वात होईल तसतसा टँकरचे दर दोन हजार रुपयांच्या घरात पोचलेला असेल असे एका टॅँकर चालकांनेच लोकमतला सांगितले.अनेक टॅँकर अनफिट आरटीओचे दुर्लक्षहे टँकर जुनाट, गळके, अनफिट असून, आरटीओ कार्यालयामध्ये सुमारे किती टँकरची नोंद आहे व किती टँकर बेकायदा पाण्याची वाहतूक करत आहेत याची उजळणी करण्याची परिवहन विभागाला गरज आहे. आठ वर्षांपेक्षा जुने झालेले ट्रक वापरण्यास बंदी आहे. याच ट्रकमध्ये फेरबदल करून त्याचे टँकरमध्ये बेकायदेशिरपणे रु पांतर करून वसईत त्याचा वापर केला जातो.अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. याची माहिती आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना पण कारवाई मात्र नाही. यामुळे, रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालवून दर वर्षाला निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या टँकर वाहतुकीवर परिवहन व वाहतूक पोलीस मेहेरबान का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Waterपाणी