शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

...अन् रिक्षावाल्यानं पाच लाखांचे दागिने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 06:02 IST

पाच लाखांचे दागिने केले परत

मीरा रोड : लंडनहून आलेल्या मूळच्या भारतीय वकील दाम्पत्याचे रिक्षात हरवलेल्या बॅगेतील पाच लाखांचे दागिने रिक्षाचालकाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा कार्यालयात बुधवारी आणून दिले. गुरुवारी सायंकाळी त्या दाम्पत्याने येऊन आपले दागिने परत घेतले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्या दाम्पत्याने पोलिसांचेही आभार मानले.बिपिनभाई पटेल हे जोगेश्वरीत राहणारे रिक्षाचालक १८ जुलैला सायंकाळी मीरा रोड भागात भाडे घेऊन आले होते. प्रवाशांना सोडल्यानंतर रिक्षाच्या मागील भागात बॅग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅग उघडली असता आत सोन्याचे दागिने होते. अंधेरीच्या यारी मार्गावरून पतीपत्नी व त्यांच्या लहान मुलाला मालाडच्या मॉलजवळ पटेल यांनी सोडले होते. त्याच प्रवाशांची बॅग असावी, असा त्यांना अंदाज आला. पटेल यांनी आपले रिक्षाचालक मित्र भूपेंद्र टेलर यांना हा प्रकार सांगितला. टेलर यांचा मुलगा अभिजित हा स्थानिक गुन्हे शाखेत उपनिरीक्षक असल्याने बॅग काशिमीरा शाखेत देण्यास सांगितले. पटेल यांनी बॅग आणून दिली.पोलिसांनी बॅगेची, रिक्षा व रिक्षाचालकाची माहिती मुंबई पोलिसांसह त्यांच्या सोशल मीडियात दिली. त्या माहितीवरून गुरुवारी सायंकाळी लंडनचे रहिवासी झालेले अ‍ॅड. जुल्फीकार लाकडावाला व त्यांची पत्नी अ‍ॅड. रचना यांनी गुन्हे शाखेचे कार्यालय गाठले. पोलिसांनी खातरजमा केल्यावर बॅग परत केली. लाकडावाला दाम्पत्य वर्सोवा येथे आपल्या आईवडिलांकडे आले होते. शिवाय, त्यांच्या एका नातलगाचे लग्न असल्याने त्यासाठी दागिने घेऊन ते मालाड येथे उतरले. पण, दागिन्यांची बॅग ते रिक्षातच विसरले होते. आंबोली पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारही केली होती.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाmira roadमीरा रोड