शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ कासव-मत्स्य प्रजाती वाचविण्याच्या मोहिमेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:22 IST

rare tortoise : मुरबे येथील मिलन तरे या मच्छीमाराने २५ फूट व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे.

पालघर : समुद्रातील नामशेष होण्याच्या मार्गातील विविध प्रकारचे मासे आणि कासव यांच्या दुर्मिळ प्रजाती वाचविण्यासाठी वन विभाग आणि मत्स्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या बक्षीस मोहिमेला मच्छीमारांमधून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरबे येथील मिलन तरे या मच्छीमाराने २५ फूट व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे. समुद्रातील अनेक प्रजातींपैकी विविध प्रकारचे शार्क, व्हेल, कासव आधी प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून या प्रजातींना संरक्षण मिळावे म्हणून कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने २१ डिसेंबर २०१८ रोजी एक आदेश काढला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत समुद्रातील दुर्मिळ होत चाललेल्या अनेक प्रजाती संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई ते झाई या ११२ कि.मी.दरम्यान ४ ते ५ हजार लहान-मोठ्या बोटींद्वारे मासेमारी केली जात असून मच्छीमारांच्या जाळ्यात शासनस्तरावरून दुर्मीळ ठरविल्या गेलेल्या व्हेल शार्क, जॉईंट गिटार फिश, इंडियन ओशियन हम्पबॅक डॉल्फिन, ऑलिव्ह रिडले कासव, लॉगरहेड, हॉक्स बिल, लेदर बॅक समुद्री कासव अशा अनेक प्रजाती अडकल्यामुळे त्यांना सोडविताना मच्छीमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान होत असे. 

जाळ्यांचे होते नुकसानकधी कधी आपल्या जाळ्याचे नुकसान होऊ नये म्हणून काही मच्छीमार या प्रजाती समुद्रात सोडण्याचे प्रयत्न करीत नसल्याने त्या प्रजातीच्या जीवितास धोका निर्माण होतो.यासाठी मच्छीमारांना आपल्या जाळ्याच्या नुकसान भरपाईपोटी काही रक्कम देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.   त्या अनुषंगाने नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये अनुदान मुख्य वनसंरक्षक कांदळवन विभाग, मॅनग्रोव्हस सेल-मार्फत मच्छीमारांना मिळावे, असे आदेश देण्यात आले होते. पालघर-ठाण्यातील ३८ मच्छीमारांच्या खात्यात पाच लाखाहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

टॅग्स :palgharपालघर