शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियांनी शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच जुंपले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:58 IST

रुपेरी वाळू, सोनेरी लाटा आणि त्यावर डोलणारी होडकी हे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. मात्र रेती चोरी आणि माफियांच्या दहशतीने हा किनारा धोकादायक बनला असून या बाबत पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे फावले आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : रुपेरी वाळू, सोनेरी लाटा आणि त्यावर डोलणारी होडकी हे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. मात्र रेती चोरी आणि माफियांच्या दहशतीने हा किनारा धोकादायक बनला असून या बाबत पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे फावले आहे.येथील नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डीच्या समुद्रात वाहनं उतरवून रेती उपशाकरिता १२ ते २२ वयोगटातील शाळा-महाविद्यालयीन ॅविद्यार्थ्यांचा वापर होतो. त्यांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल, दुचाकी आणि मद्याचे आमिष दाखवले जाते.रात्री आठ ते पहाटे पाच दरम्यान हा प्रकार घडतो. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षतेने पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. तरु ण वर्ग गुन्हेगारीकडे वळल्याने रेती चोरांच्या गटांमध्ये कमालीचा संघर्ष आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. सार्वजनिक उत्सव आणि लग्नसराई काळात या दडपणाचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे किनाऱ्यावर मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी जाण्याचे प्रमाण ही घटले आहे. लगतचा डहाणू- बोर्डी प्रमुख राज्य मार्ग रात्री आणि पहाटे धोकादायक बनला असून प्रशासनाने वेळीच उपाय न योजल्यास निष्पापांचा बळी जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार