शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू आदिवासी प्रकल्प कार्यालयावर विद्यार्थी-पालकांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:58 IST

पाचगणी येथील नचिकेता हायस्कूल ही नामांकित निवासी इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय अप्पर आयुक्त ठाणे यांनी 14 ऑगस्ट रोजी काढला.

डहाणू- पाचगणी येथील नचिकेता हायस्कूल ही नामांकित निवासी इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय अप्पर आयुक्त ठाणे यांनी 14 ऑगस्ट रोजी काढला. या शाळेत  डहाणू आदिवासी प्रकल्पाअंतर्गत सुमारे साडेपाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात.  दरम्यान हा आदेश मान्य नसल्याचे सांगत, मंगळवार 27 ऑगस्ट रोजी  विद्यार्थी- पालकांनी या प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून अन्य शाळेत समायोजनाला विरोध दर्शविला. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासंबंधी 2009 साली योजना शासन निर्णयाद्वारे राबविण्यात आली. याा वर्षी  डहाणू आदिवासी प्रकल्पाअंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यातील सुमारे साडेपाचशे विद्यार्थी पाचगणी येथील नचिकेता हायस्कूल मध्ये शिक्षण घेत आहेत. दरम्यान 14 ऑगस्ट 2018 रोजीच्या अप्पर आयुक्त ठाणे यांच्या परिपत्रकानुसार ही शााळा बंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये समायोजित केले जाणार आहे. मात्र या बद्दल विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला, काहींना भोवळ आली तर अनेकांना जेवणही जात नाही. या विद्यार्थ्यांनी अन्य शाळेत समायोजित होण्यास नकार दिला आहे. कोणालाही विश्वासात न घेता, हा निर्णय माथी मारला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.या करिता आदिवासी प्रकल्प आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनाही निवेदन दिले. मात्र प्रश्न सुटलेला नाही. शाळेचे संचालक मंडळ आणि प्रशासनातील अंतर्गत वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. तत्काळ हा निर्णय मागे घेत, शाळा सुरू करण्याच्या मागणी करीत डहाणू प्रकल्प कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी सह्याचे सामुदायिक निवेदन प्रकल्प कार्यालयाला सादर केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी लोकमतशी भावना बोलून दाखवल्या, त्यांना अश्रू आवरणे अशक्य झाले होते.  दरम्यान तत्काळ तोडगा न निघाल्यास आगामी काळात निदर्शनं, मोर्चा आणि ठिय्या आंदोलन पालघर जिल्ह्यात छेडण्यात येईल,  अशी माहिती पालकांचे प्रतिनिधी कृष्णा कुवरा यांनी लोकमतशी बोलताना दिली.