शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

विद्यार्थ्यांची नावे जाणार थेट मंगळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:20 IST

पहिलीतील ३६ विद्यार्थ्यांची नावनोंदणी : डहाणूतील जि.परिषदेच्या शिक्षकाचा पुढाकार

अनिरुद्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू/बोर्डी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद आता थेट मंगळावर होणार आहे. नासा नॅशनल एरोनोटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे ‘मंगळरोव्हर २०२०’ हे अंतरिक्षयान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या यानावरील स्टेन्सिल्ड चिपवर नावे पाठविण्याची संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत या विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी केली जाणार आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे प्राथमिक शाळेतील शिक्षक पावबाके यांनी रविवार, ७ जुलै रोजी पहिल्या इयत्तेतील ३६ विद्यार्थ्यांची नावनोंदणी केली.नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या (जेपीएल) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (७५ नॅनोमीटर) रुंदीत नागरिकांकडून नोंदविण्यात आलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर तब्बल दहा लाख नावे मावतील. या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील. ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रोव्हर तयारी करत असताना, सर्वजण या नव्या मोहिमेत सहभागी व्हावेत, सर्वांना याची माहिती व्हावी, असे आम्हाला वाटते, असे नासाच्या वॉशिंग्टन येथील येथील सायन्स मिशनचे एसएमडी थॉमस झुरबुचेनचे म्हणणे आहे.

या मोहिमेअंतर्गत गोवणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावांची आॅनलाइन नोंदणी केली असून त्या सर्वांचे आॅनलाइन बोर्डिंग पासही उपलब्ध झाल्याचे पावबाके यांनी सांगितले. विशेषत: मराठी भाषा आणि मराठी शाळा यांची अस्मिता जपत मराठीमध्ये त्यांची नोंदणी केली आहे. या उपक्र मांतर्गत मंगळावर पाठवण्याकरीता विद्यार्थ्यांचे किंवा शाळेचे नाव ३० सप्टेंबर २०१९ च्या रात्री ११.५९ पर्यंत ें१२.ल्लं२ं.ॅङ्म५ या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासह, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तसेच अवकाश संशोधन शास्त्राचा प्रचार प्रसार करण्याची सुवर्ण संधी असल्याचे पावबाके म्हणाले.मंगळावर नावे पाठवण्याच्या मोहिमेत तुर्की प्रथमस्थानी असून भारत दुसऱ्यास्थानी आहे. जास्तीत जास्त भारतीयांनी या मोहिमेत सहभाग नोंदवल्यास भारत देखील प्रथमस्थानी झेप घेऊ शकतो. जिल्ह्यातील शाळांमधून अशा नावनोंदणीस प्रारंभ झाला आहे.- विजय पावबाके, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोवणेतुम्हीही करू शकता नोंदणी : रोव्हर २०२० हे यान ‘अ‍ॅटलस व्ही ५४१’ या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ आॅगस्ट २०२० मध्ये लॉन्च केले जाणार आहे. ते २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहोचण्याची शक्यता आहे. या उपक्र मांतर्गत आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी खालील लिंक ओपन करा आणि आपला बोर्डिंग पासही https://go.nasa.gov/Mars2020Pass मिळवता येतात.