शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

खुटल आश्रमशाळेत विद्यार्थिनींना करावी लागते पॅसेजमध्ये आंघोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:48 IST

बोईसर पूर्वेकडील खुटल येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमधील वयात आलेल्या विद्यार्थिनीना वर्षाच्या बारा महिने थंड पाण्याने तेही शाळेच्या पॅसेजमध्ये आंघोळ करावी लागते.

- पंकज राऊतबोईसर : बोईसर पूर्वेकडील खुटल येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमधील वयात आलेल्या विद्यार्थिनीना वर्षाच्या बारा महिने थंड पाण्याने तेही शाळेच्या पॅसेजमध्ये आंघोळ करावी लागते. तर शाळेमध्ये बसण्यास बेंच नसल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागते. या आश्रमशाळेला महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधल्या नंतर पत्रकारांना ही विदारक स्थिती सांगितली.इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या या आश्रमशाळेमध्ये २६३ विद्यार्थी तर २७१ विद्यार्थिनी असे एकूण ५३४ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी १४० विद्यार्थी व १६९ विद्यार्थिनी असे एकूण ३०९ विद्यार्थी या आश्रम शाळेत निवासी शिक्षण घेत आहेत.२७१ विद्यार्थिनी पैकी २०५ विद्यार्थिनी ह्या १० ते १५ वयोगटाच्या आहेत. या आश्रमशाळेमध्ये जनरेटर आहे परंतु तो काही महिन्यांपासून नादुरु स्त असल्याने रात्री ७ ते १० पर्यंत भारिनयमनाच्या काळामध्ये चक्क मेणबत्त्यांच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत आहे तर पाणी नसल्याने स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.त्याचप्रमाणे वॉश बेसिनच्या नळांची ही अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने स्वच्छतेचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत.>जेवण-नाश्त्यात १२ तासाचा गॅपसंध्याकाळचे जेवण साधारणत: सहा ते साडेसहा पर्यंत दिले जात असून दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास नाश्ता (सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील कांबळगावच्या मध्यवर्ती स्वयंपाक घरातून येतो) दिला जातो हा गॅप १४ तासाचा होत असल्याने वाढत्या वयाच्या विद्यार्थ्यांना भुकेने व्याकूळ व्हावे लागते, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या सोबत पालघर जिल्हा महिला रा. काँ.च्या अध्यक्षा नीलम राऊत, तालुका अध्यक्ष संजय पाटील, महिला अध्यक्षा महानंदा राऊत, जिल्हा निरीक्षक सोनल पेडणेकर व आफ्रिन शेख, नीलम मोरे, ललिता राऊत, निलिमा राऊत, कमल राऊत होत्या.