शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:41 IST

पालघर रेल्वे स्टेशनवरून सुटलेली वलसाड शटल ट्रेन पकडण्याच्या नादात पाय घसरून गाडीखाली जाणाऱ्या...

पालघर : पालघररेल्वे स्टेशनवरून सुटलेली वलसाड शटल ट्रेन पकडण्याच्या नादात पाय घसरून गाडीखाली जाणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यात पोलीस शिपाई अरविंद वरुटे याला यश मिळाले आहे. या घटनेत ते स्वत: जखमी झाले आहेत.पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात एफ.वाय.बी.कॉम. च्या वर्गात शिकणाºया मोहम्मद अमीर आरिफ मुंसी (१८, रा. एच.डी. बेहराम सोसायटी मल्यान, डहाणू) हा आपले सकाळचे कॉलेज आटपून डहाणू येथे घरी जाण्यासाठी पालघर रेल्वे स्टेशनकडे येत असताना. प्लॅटफॉर्म क्र. १ वर उभी असलेली वलसाड शटल सुटली. या गाडीने वेग घेतला असतानाही मोहम्मद अमीर याने धावत जात ती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी वेगात असल्याने डब्याच्या दांडीला पकडलेला त्याचा हात सुटून तो प्लॅटफॉर्मवरून घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधील गॅपमध्ये जाऊ लागला. प्लॅटफॉर्मवर असलेले पोलीस शिपाई वरूटे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ धावत जात त्या विद्यार्थ्याचे दोन्ही हात पकडीत त्याला त्या गॅपमध्ये पडण्यापासून वाचवले.गाडी वेगाने निघून गेल्यानंतर ते दोघेही रेल्वे रुळात पडले. २ नंबर प्लॅटफॉर्मवर असलेले पोलीस शिपाई उबाळे आणि पोलीस शिपाई गाडेकर यांनी रुळात उतरून जखमी विद्यार्थी आणि सहकारी पोलिसास ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. पालघर रेल्वे पोलीस स्टेशन मधील कार्यरत पोलीस शिपाई अरविंद वरु टे आणि इतर कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका अठरा वर्षाच्या मुलाचा जीव वाचिवण्यात त्यांना यश आले. या तरुणाच्या कमरेला मार लागला आहे.

टॅग्स :palgharपालघरrailwayरेल्वे