शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांना घरातून खेचून चांबळेत बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:06 IST

अकरा आरोपींवर गुन्हा दाखल

वाडा : या तालुक्यातील चांबळे गावातील तरूणांना घरातून फरफटत बाहेर नेऊन कामाच्या ठेक्याच्या वादावरून बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अकरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नरेंद्र पाटील, चेतन पाटील अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्या हाता पायाला व डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील चांबळे या गावात नरेंद्र पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी आपली जमिन एका उद्योजकाला विकली असून त्या जमिनीवर कारखाना टाकताना जे बांधकाम होईल. त्याचा ठेका नरेंद्रला देण्याचे उद्योजकाने मान्य करून तसा करार केला होता. कारखान्याच्या जागेचे सपाटीकरण (लेव्हलिंग) सुरू असतांना गावातील विरोधक आरोपी हे जागेवर जाऊन काम बंद कर येथे तुम्ही काम करायचे नाही असे सांगितले. नाहीतर परिणामांना सामोरे जा असा सज्जड दम भरला. त्यानंतर दोघांत बाचाबाची होऊन नरेंद्र याला दंडुक्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर नरेंद्र पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना लोहोपे बसथांब्याजवळ पुन्हा मारहाण केली. त्यानंतर घाबरून फिर्यादी येथील एका घरात लपण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याला त्या घरातून फरफटत बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी व दंडुक्याने मारहाण केली. नरेंद्र चा भाऊ चेतन व नरेंद्र ची पत्नी सोडवायला आले असता त्यांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघां भावांच्या हाता पायाला व डोक्यावर गंभीर दुखापती झाल्याने त्यांच्यावर ठाणे येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या झटापटीत फिर्यादी यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तसेच गंठण कोठेतरी पडून गहाळ झाले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी