शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस; महापालिकेने जवाबदारी ढकलली पोलिसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 23:23 IST

पावसाळ्यापूर्वी पालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल महानगरपालिका दरवर्षी तयार करते.

नालासोपारा : गेल्या ४ दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पुण्यातील कोंढवा येथे सोसायटीच्या इमारतीची संरक्षक भिंत पडून १६ मजुरांच्या मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वसईमधील धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर असल्याने पावसाळ्यात कोणती तरी अनुकचित घटना घडेल म्हणून स्वत:ची जवाबदारी झटकून वसई विरार महानगरपालिकेच्या जी प्रभागाच्या सहायक आयुक्त सुभाष जाधव यांनी पोलिसांना लेखी नोटीस धाडून अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.पावसाळ्यापूर्वी पालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल महानगरपालिका दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची तीन वर्गात वर्गवारी केली जाते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्यांना तात्काळ खाली करायचे असते. पालिकेकडे संक्र मण शिबिर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतींच्या रहीवाशांना बाहेर काढून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अशा इमारतीमधील रहिवाशांची घरे खाली करून संक्र मण शिबिरामध्ये पुनर्वसन करण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेकडे असते पण स्वत:ची जवाबदारी झटकून अनुकुचित प्रकार घडला तर महानगरपालिका जवाबदार राहणार नसून सर्वस्वी जवाबदारी पोलिसांची असल्याचे नोटीसीत नमूद केले आहे. वालीव प्रभागात ३७ धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतींच्या नावांच्या यादीची एक प्रत आणि नोटीसीसोबत महानगरपालिकेच्या अधिकाºयाांी वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी धाडली आहे. यानोटिसीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी उत्तर पाठवले असल्याचेही सूत्रांकडून कळते. पावसाळ्यात धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात.किती इमारती वसई तालुक्यात धोकादायक...महानगरपालिकेने ५८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी १९८ अतिधोकादायक इमारती, सी वन मध्ये ८१ इमारती, सी टू मध्ये १९७ इमारती तर सी थ्रीमध्ये १११ इमारती अशी यादी मनपाने तीन गटात वर्गवारी केली आहे.परंतु अद्यापही १९८ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवासी रहात आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये अजूनही शेकडो कुटुंब रहात आहेत.धोकादायक किंवा अतीधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे व राहिवाशांना खाली करण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेची आहे. घरे खाली करताना पोलीस बंदोबस्त पाहिजे असेल तर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार देण्यात येईल.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार