शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
2
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
3
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
4
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
5
करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…
6
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
7
जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
9
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
10
हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
12
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
13
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
14
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
15
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
16
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
17
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
18
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
19
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
20
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

विक्रमगड तहसीलवर ताण; १८ वर्षे भरतीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:52 IST

पुरवठा विभाग व संजय गांधी विभागाचे काम महसूलच्या माथी

- राहुल वाडेकरतलवाडा : विक्रमगड तहसील कार्यालयातील पुरवठा व संजय गांधी विभागामध्ये गत १८ वर्षांपासून पद भरलेलेच नाहीत. किंबहुना वरील दोन्ही विभागांमध्ये पदांची निर्मितीच झाली नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे ते काम इतर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटून घ्यावे लागते. त्यामुळे एकुणच प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५ हजार ५२७ हेक्टर आहे़ यात ९४ गावे, तर ४२३ पाडयांचा अतर्भाव होतो. ़पिकाखालील क्षेत्र २०,५७९ हेक्टर तर कुरणाखालील क्षेत्र २१ हजार २१८ इतके आहे़ तालुक्यात प्रामुख्याने भात, नागरी, वरई अशी पिके घेतली जातात़ २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,१४,२५४ च्या घरात पोहचली आहे़ सध्यस्थितीत ३९ ग्रामपंचायती व ३ ग्रामदान मंडळ व एक नगरपंचायतीचा समावेष यात करण्यात आला आहे़१९९९ मध्ये तहसील कार्यालय स्थापन झालेले आहे़ तेव्हापासून येथील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात बसण्यासाठी योग्य ती व्यवस्था झालेली नाही़ सध्या हे कार्यालय पुर्वीच्या मंडळ अधिकारी कार्यालयात भरविले जात आहे. नविन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात अडकून पडलेला असल्याने अपुरे कर्मचारी व योग्य त्या सुविधा नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे़विक्रमगड तहसील कार्यालयात पुरवठा विभाग, महसूल विभाग, संजय गांधी विभाग, एम़ आर जी. एस विभाग, निवडणूक विभाग आदी विविध विभाग एकत्र काम करीत आहेत. गत १८ वर्षांपासून या विभागातील महसुल विभाग सोडला तर दुसºया कोणत्याही विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची भरती झालेली नाही. एकही पद मंजूर नसल्याने विभागाची निर्मिती तरी का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे.़ त्यामुळे महसूल विभागतील कर्मचारी व अधिकाºयांनाच वरील विभागांच्या कामाचा निपटारा करावा लागतो. या प्रशासकीय अनागोंदीमुळे येथील आदिवासी ग्रामस्थांची कामे वेळेत होत नाही. साध्या कामांसाठी त्यांना वारंवार या कार्यालयाच्या खेटे मारावे लागत आहेत. आधिच आठराविश्व दारिद्रय असणाºया गोर गरीबांना वारंवार पदरमोड करावी लागते आहे.शासनदरबारी प्रयत्न तोकडेयासंदर्भात शासनाला पत्रव्यवहार केला जात असुनही योग्य उपाययोजना केली जात नसल्याने त्याचा विपरीत परीणाम विकासकामांवर होत आहे़ या विभागातील रिक्त पदांमुळे व अनेक पदे मंजुरीविना असल्याने विकासकामांना खीळ बसली आहे़ वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यामुळे येथील स्थानिक लोकप्रनिधी आमदार, खासदार, आदिवासी विकास मंत्री, पक्ष प्रमुख करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार