शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

एसआरटी पद्धत ठरते वरदान , कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:37 AM

तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे

वसंत भोईरवाडा : तालुक्यातील शेतक-यांनी आता पारंपरिक भात शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरूवात केली आहे. यामध्ये एसआरटी व मिल्चंग पध्दत अशा अनेक पध्दतीने भात शेती करत आहेत. एसआरटी ही पध्दतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी असल्याने ती आता शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाड्याचा वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून वाशी (नवी मुंबई) व मुंबईच्या बाजारापेठेत त्याला विशेष मागणी आहे. विशेष म्हणजे हा तांदळाचा अगदी लहान दाणा आणि चवीला व पचायला हलका अशी त्याची वैशिष्ट्य असल्याने राज्यभर तो प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी पारंपारिक शेती करीत असतानाच आता आधुनिकतेकडे वळले आहेत. काही शेतकरी भाताच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करून नवनवीन प्रयोग करत आहेत.आता येथील काही शेतकºयांनी एसआरटी (सगुणा राईस टेक्नॉलॉजी) या पद्धतीचा अवलंब करून शेती केली आहे. या पध्दतीत सर्वप्रथम जमिनीत वाफे केले जातात. त्यानंतर पाणी पडल्यानंतर बियाणे वाफ्यात टाकले जाते. त्यामुळे भात लावणी, बेणणीचा खर्च येत नाही. तसेच मजूरही कमी लागतात. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न या पद्धतीत शेतकºयांना घेता येते. एकरी फक्त सात ते आठ हजार रूपयांचा खर्च या पध्दतीत येतो. एका बिजापोटी सुमारे ६५ ते ७० फुटवे आता आल्याने भरघोस उत्पन्न आले आहे.ही पध्दत राबविताना कंपनीचे संचालक चंद्रशेखर भडसावले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ते शेतकºयांना निशुल्क माहिती देतात असेही चौधरी यांनी सांगितले. शेतकºयांनी पारंपारिक शेतीला छेद देत आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते. असे त्यांचे म्हणणे आहे. किशोर चौधरी यांनी भाताबरोबर आपल्या शेतात शेवगा, लिंबू, आंबा व मोगरा यांची झाडे लावली असून त्यातून ते उत्पन्न घेत आहेत.एकदा वाफे घ्या, दहा वर्षे वापराघोणसई येथील प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी हे मुंबई महानगर पालिकेतून सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आता आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत.एसआरटी पध्दतीत त्यांनी आपल्या एक एकर जमीनीवर लावली असून आता हे भरपूर पीक आले आहे. या पध्दतीत किमान पिक तयार व्हायला १२० दिवस लागतात. तसेच हळव्या व गरव्या या दोन्ही शेतीत ही पध्दत होते असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय एकदा वाफे तयार केले की, पुढील दहा वर्षांत हेच वाफे वापरता येतात. तसेच वर्षातून या वाफ्यात तीन पिके घेता येतात. भात कापणीनंतर भाजीपाला व कडधान्ये अशी पीक घेता येतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी