शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे रमाबाईच्या खुनाचा उलगडा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:38 IST

रस्त्यांवरील खड्डयांमुळे अ़नेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडत असतात. वसईत मात्र खड्डयांमुळे चक्क हत्येचा उलगडा झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह घेऊन जातांना करंजोण येथील खड्ड्यात अपघात झाल्याने रमाबाईच्या हत्येचा उलगडा होऊन तिचा पती आपल्या साथीदारांसह गजाआड झाला.

विरार : रस्त्यांवरील खड्डयांमुळे अ़नेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडत असतात. वसईत मात्र खड्डयांमुळे चक्क हत्येचा उलगडा झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह घेऊन जातांना करंजोण येथील खड्ड्यात अपघात झाल्याने रमाबाईच्या हत्येचा उलगडा होऊन तिचा पती आपल्या साथीदारांसह गजाआड झाला.नामदेव रमाबाईपासून विभक्त झाला होता. त्याने दुसरे लग्नही केले होते. तो रेल्वे कामाला असल्याने रमाबाईने त्याच्याकडे पोटगी आणि मालमत्तेत हिस्सा मागण्यास सुरुवात केली होती. म्हणूनच पोटगी आणि मालमत्तेत हिस्सा मागणाºया रमाबाईचा काटा काढण्यासाठी पती नामदेव पाटील याने अडीच लाखाची सुपारी चंद्रकांत पडवळेला दिली होती. यातील आरोपी वंदना पवारने ९ सप्टेंबरला रमाबाईला काम देण्याच्या बहाण्याने करंजोण येथील एका फार्म हाऊसवर बोलावून घेतले होते. तिला रात्री थांबवून नॉनव्हेजचे जेवणही दिले होते. त्यानंतर वंदना पवारसह चंद्रकांत पडवळे, पांडुरंग कदम लक्ष्मण कोबाड, लक्ष्मण पवार, राकेश पवार यांनी नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून रमाबाईचा खून केला होता.एका मोटारसायकलवरून दोघे मृतदेह जंगलात टाकण्यासाठी नेत असतांना बादणपाडा येथील खड्ड्यात बाईकवरून ते पडले. कुत्री भुंकल्याने घाबरून मारेकरी मृतदेह तिथेच टाकून पळून गेले. कुत्र्यांच्या भुंकण्याने काही गावकरी जागे झाले होते. त्यांनी मृतदेह पाहून विरार पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात रमाबाईच्या मारेकºयांना गजाआड केले.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून