शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

दिवा-वसईच्या गाड्यांची गती वाढायला हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:09 IST

डिझेलऐवजी विजेवर चालणाया मेमू गाड्या सुरू झाल्याने आता गाड्यांची गती वाढायला हवी, असे दिवा-वसई मार्गावरील प्रवाशांचे म्हणणे आहे.

डिझेलऐवजी विजेवर चालणाया मेमू गाड्या सुरू झाल्याने आता गाड्यांची गती वाढायला हवी, असे दिवा-वसई मार्गावरील प्रवाशांचे म्हणणे आहे. दीर्घकाळ हा मार्ग सुविधांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. त्याचा दोन्ही दिशांना पनवेल आणि डहाणूपर्यंत विस्तार झाला. या मार्गाला उपनगरी सेवेचा दर्जा दिला; पण फेऱ्या आणि गती न वाढल्याचा फटका बसत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.दिवा-वसई मार्ग सुरू झाल्यावरही त्यावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आंदोलने करावी लागली. तेथे डिझेलवर चालणारी पूश पूल सेवा रेल्वेने सुरू केली; पण त्याच्या फेºयांत आजतागायत लक्षणीय वाढ झालेली नाही. आता डिझेलऐवजी इलेक्ट्रिकवर चालणारी मेमू सेवा सुरू झाली असली, तरी त्याचा वाहतुकीवर फारसा परिणाम दिसून आलेला नाही. नव्या गाड्यांमुळे गती वाढेल, ही अपेक्षाही फारशी सफल झालेली नाही.वस्तुत: उपनगरी मागार्चा दर्जा दिल्यानंतर या मार्गावरून लोकल धावतील, अशी अपेक्षा होती; पण गेली दहा वर्षे त्यासाठी गाड्या (रेक) नसल्याचे कारण पुढे केले जाते आहे. मध्य रेल्वेचा मुख्य आणि हार्बर मार्ग, तसेच पश्चिम रेल्वेला जोडणारा हा मार्ग असल्याने तेथे लोकल सुरू होणे ही गरज आहे. बम्बार्डियर लोकल आल्यावर किमान जुन्या लोकल तरी या मार्गावर धावतील अशी अपेक्षा होती. तीही आशा पूर्ण झालेली नाही. या मार्गावर ११ नवी स्थानकेही उभारण्याचा निर्णयही असाच दोन वर्षे बासनात आहे.सध्या तरी या मार्गावर फेºया वाढणे आणि गती वाढणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी मांडले आहे. सध्या प्रत्येक स्थानकावर गाडीला साधारणत: दोन-दोन मिनिटांचा थांबा आहे. तो वेळ सहज कमी करणे शक्य आहे. दिव्याहून वसईच्या पुढे जाणाºया अनेक गाड्या वसई, विरारसह मधील अनेक स्थानकांत १५ ते २० मिनिटे थांबवल्या जातात. वेळापत्रकात फेरबदल केले, तर हा वेळही वाचवता येऊ शकतो. याबाबत वारंवार मागण्या करूनही रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कल्याण, भिवंडी, पालघरच्या खासदारांनी हा प्रश्न रेल्वेकडे लावून धरून तातडीने वेळापत्रकाची फेररचना करण्याचा आग्रह धरायला हवा. फेºया आणि गती वाढावी, यासाठी आग्रह धरायला हवा.दिवा-वसई मार्गावरील फेºयांत दोन ते पाच तासांचे अंतर आहे. तेही कमी व्हायला हवे. केवळ हा मार्ग जरी दिवा-वसई म्हणून प्रसिद्ध असला, तरी त्यावरून पनवेल ते डहाणूदरम्यान गाड्या वाढवायला हव्यात. पनवेल ते पेणदरम्यान मेमू गाडीची चाचणी यशस्वी झाल्याने पेण ते डहाणू अशा फेरीचाही विचार व्हायला हवा, असे वाचकांनी सुचवले आहे.बोईसर गाडीचा विस्तार व्हावासकाळच्या वेळी डोंबिवलीहून बोईसरला जाणाºया गाडीची गती वाढवायला हवी. तिचा वसई, केळवे रोडमधील १५ ते २० मिनिटांचा थांबा कमी केला, तर त्या प्रवासातील अर्धा तास वाचेल. शिवाय ही गाडी डहाणूपर्यंत नेली तर पालघर ते डहाणूदरम्यानच्या सर्व प्रवाशांना फायदा मिळेल. शिवाय सुरत, गुजरातला जाणाºया प्रवाशांना चांगला पर्याय उपलब्ध होईल.दिवा-पनवेलच्या गाड्याही सुरू व्हाव्यातदिवा-पनवेल या मार्गावर गाड्या सुरू व्हायला हव्या. त्याचा निळजे, तळोजा, नावडे, कळंबोलीच्या प्रवाशांना फायदा होईल. दिवा-पनवेलदरम्यान लोकल वाहतूक सुरू झाली, तर ठाणे-पनवेल मार्गावरील ताण कमी होईल. प्रवाशांचा वेळ वाचेल.कोपर स्थानकाचा विकास गरजेचापनवेल-वसई या मार्गावरून सध्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या जातात; पण मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांना त्या गाड्यांचा काहीच फायदा होत नाही. त्या गाडीत चढण्यासाठी प्रवाशांना पनवेल किंवा वसई गाठावे लागते. कोपर स्थानकाचा विस्तार झाला, तेथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबू लागल्या, तर प्रवाशांना जवळचा पर्याय खुला होईल.घोषणा करण्यापेक्षा अंमलबजावणीवर भर द्या!दिवा-वसई मार्गावर डिझेलवरील मेमू गाड्या विजेवर चालवण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वे प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणता येईल. मात्र, रेल्वे प्रशासन या निर्णयाची अंमलबजाणी कधी करते हे पाहणे महत्त्वाचे आहे. ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या मार्गाचे दहा वर्षे काम रखडत असल्याचे ताजे उदाहरण समोर आहे. परिणामी, केवळ घोषणा करायची आणि माध्यमांमधून कौतुक करून घ्यायचे रेल्वे प्रशासनाचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात दिवा-वसई मार्गावरील प्रवाशांचे हाल जैसे थे असून, या परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. यामुळे घोषणांपेक्षा अंमलबजावणीवर भर देऊन प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे.- विशाल सावंत, वसईदर तासाला गाड्या सोडा!दिवा-वसई मार्गावर डिझेलऐवजी विजेवर चालणाºया मेमू गाड्या सुरू झाल्या आहेत. यामुळे या मार्गावरील गाडीचा वेग वाढणार असला तरी या मार्गावर मेमू फेºयांची संख्या वाढवण्यात येणे गरजेचे आहे. सध्या या मार्गावर प्रवाशांच्या तुलनेत फार कमी प्रमाणात फेºया चालवण्यात येत आहेत. त्यामुळे या मार्गवर दर तासाला गाड्या सोडणे गरजेचे आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल. - सूरज क्षीरसागरदिवा-वसई रेल्वे मार्गाला सापत्न वागणूकदिवा-वसई मार्ग मुंबई रेल्वेमध्ये येतो, याचाच रेल्वे अधिकाºयांना विसर पडला आहे. यामुळे या मार्गावरील फेºयांचा, ट्रेनच्या वेगांचा आणि पर्यायाने प्रवाशांचा कोणताही विचार रेल्वे प्रशासनाकडून केला जात नाही. हार्बर मार्गापेक्षाही दिवा-वसई रेल्वेमार्गाला सापत्न वागणूक मिळत आहे. दिवसेंदिवस दिवा-वसई मार्गावर प्रवासी संख्या वाढत असताना रेल्वेकडून कोणत्याही नवीन रेल्वे किंवा वाढीव फेºयांबाबत निर्णय होत नसल्याचे वास्तव आहे.- अमृता सिंग, दिवामुंबईमध्ये मेमू ट्रेन चालवाव्यातमध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी पाहता शौचालयांची सोय असलेल्या मेमू ट्रेन चालवणे गरजेचे आहे. मेमूची प्रवासी क्षमता सिमेन्स, बंबार्डिअर किंवा वातानुकूलित लोकलपेक्षा जास्त आहे. तसेच बैठक व्यवस्था आणि दरवाजेही लोकलपेक्षा जास्त आहेत. यामुळे प्रवाशांना चढ-उतार करणे सोईस्कर होईल. दोन बोगींमधील मार्गिकेचा वापर करून प्रवासी पुढे सरकू शकतात. यामुळे दरवाजांवरील होणारे वाद संपुष्टात येतील. एकूणच प्रवाशांना सुखद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबईत मेमू ट्रेन चालवणे योग्य राहील- निखिल चौगुले, विरार

टॅग्स :Vasai Virarवसई विरारrailwayरेल्वे