शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर येथील उद्योगांची विशेष तपासणी मोहीम पूर्ण, दोषी उद्योगांवर लवकरच उगारणार कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:44 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे.

- पंकज राऊतबोईसर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची आॅक्टोबर महिन्यापासून सुरू केलेली विशेष तपासणी मोहीम (सर्व्हे) आता पूर्ण झाली असून प्रयोग शाळेतून रिझल्ट येणेही सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच दोषी उद्योगांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने कारवाईच्या भीतीचे औद्योगिक क्षेत्रात सध्या भीतीचे वातावरण आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगामधून आणि सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केन्द्रातून (सीईटीपी) मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी हे पुरेशी प्रक्रिया न करताच नवापूरच्या समुद्रात सोडले जाते. याचा किनारपट्टी भागातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ लागल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्यानंतर लवादाने विशेष तपासणी मोहीमेसंदर्भात दिलेल्या आदेशानुसार तीन टप्प्यांमध्ये सुमारे ५०० उद्योगांचा सर्व्हे करण्यात आला.या सर्व्हेमध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई तसेच ठाणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुमारे ३२ अधिकारी सहभागी झाले होते. कारखान्यातून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेऊन ते पृथ:करणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते तर हवा मॉनिटरिंग टीमने चिमणीचे सॅम्पलिंग केले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगांना दिलेले संमतीपत्र (कन्सेंट)प्रमाणे उत्पादन सुरू आहे का? संमती पत्रातील अटी व शर्तीनुसार उत्पादन घेतले जात आहे का? त्याच बरोबर अटी व शर्तींचे पालन होते आहे की नाही याबाबत बारकाईने तपासणी करण्यात आली.तारापूरच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून जल व वायू प्रदूषण तसेच दुर्गंधीयुक्त वायुमुळे परिसरातील लाखो नागरिक प्रचंड त्रस्त असून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये तारापूर वसाहत देशात प्रथम आहे.सर्व्हे पारदर्शक झाला का ? : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार सदर सर्व्हे झाला असला तरी सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे इथपासून तो सुरू झाल्याची बातमी तारापूर क्षेत्रात वाºयासारखी पसरली होती. त्यामुळे सर्व्हे दरम्यान काही उद्योग देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू होती. तर तपासणीत काही दोष व त्रुटीसमोर येऊ नयेत म्हणून एरवी पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांनी खबरदारी घेतली होती. त्यामुळे या सर्व्हेबाबत संशयाचे वातावरण असून पारदर्शक सर्व्हेे झाला का असे येथील सर्व सामन्यांना विचारले असता ‘नाही’ असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे आता ज्या ५०० उद्योगांचा सर्व्हे झाला आहे त्यापैकी ५० उद्योगांचा कुठलाही गाजावाजा न करता अचानक (सरप्राईज) उच्च पातळीवरून पुन्हा सर्व्हे केला तर सदर सर्व्हे पारदर्शक झाला की नाही ते समोर येण्याची शक्यता असून संशयाचे वातावरणही खºया अर्थाने दूर होईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार