शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या बंद योजना मार्गी लावा; पाणीपुरवठामंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:29 IST

केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणीच्या आधारित धोरणांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. 

पालघर : मुंबई, मीरा-भाईंदरला पाणी पुरवणारा पालघर जिल्हा मात्र तहानलेला राहत असल्याने मुख्यमंत्री चिंतित असून जिल्ह्यातील ९० टक्के बंद अवस्थेतील योजना येत्या दोन महिन्यांत मार्गी न लागल्यास कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड दम पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीदरम्यान दिला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणीच्या आधारित धोरणांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. 

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जव्हार तालुक्यात १४, डहाणू ३१, तलासरी ३, पालघर ७, मोखाडा ९, वसई १, वाडा ६ तर विक्रमगड २ अशा एकूण ७३ पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू असताना एकाही योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा लोकांपर्यंत होत नसल्याची बाब उपस्थित लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.  जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र युती असून ठेकेदारच पाणीपुरवठा विभाग चालवितात काय, असा संतप्त सवाल आमदार सुनील भुसारा यांनी उपस्थित केला.

मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारला पाणी पुरविणारा आमचा जिल्हा मात्र कित्येक वर्षांपासून तहानलेला राहिला असून जिल्ह्यातील एकही पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याचे सांगून धरण क्षेत्रातून विस्थापित झालेल्यांचे अजून पुनर्वसन झाले नसल्याची बाब खासदार राजेंद्र गावितांनी निदर्शनास आणून दिली.

विश्वास फाउंडेशनचे डॉ. विश्वास वळवी यांनी मंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नातून पाणीपुरवठामंत्र्यांना पालघरला आणण्यात यश मिळविले. यावेळी जि.प. अध्यक्षा भारती कामडी, माविम अध्यक्षा ज्योती ठाकरे, आ. श्रीनिवास वणगा, राजेश पाटील, सेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेश शहा, ज्योती मेहेर, तालुकाध्यक्ष विकास मोरे, सभापती सुशील चुरी, काशिनाथ चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :palgharपालघर