शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सोशल इंटिग्रीटीला निधीअभावी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:44 IST

जातीधर्माच्या भिंती तोडून एकसंध समाजनिर्मितीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सुरू केलेल्या मदतीला पैशा

रविंद्र साळवे मोखाडा : जातीधर्माच्या भिंती तोडून एकसंध समाजनिर्मितीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सुरू केलेल्या मदतीला पैशा अभावी ब्रेक बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सद्य:स्थितीत मदतीसाठी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे १६५ प्रस्ताव लटकलेलीच आहेत. याबाबत दैनिक लोकमत मध्ये २७ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते परंतु महिन्याभराचा कालावधी उलटूनही पालघर समाज कल्याण विभागाला जाग आलेली नाही ही बाब खेदाने म्हणावी लागेल२०१७-१८ या आर्थिक वर्षात केंद्र शासन ४० लाख व महाराष्ट्र राज्य ४० लाख अशी ८० लाखाची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात केंद्रा कडून २८ लाख अनुदान आले तर राज्य सरकार कडूनक निधीच उपलब्ध झालेला नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९७ प्रकरण सादर केली. पैकी ६१ प्रकरणे मंजूर झाली व ३७ प्रकरणे शिल्लक राहिली यासाठी फक्त शासनाने १४ लाख ९५ हजार मंजूर केले२०१५-१६ या आर्थिक वर्षात ७१ लाभार्थी असून शासनकडे ३१ लाख ३० हजार अनुदानाची मागणी करण्यात आली परंतु अनुदान उपलब्ध झाले नाही. २०१७-१८ चे अनुदान केवळ केंद्र सरकार कडून आले आहे परंतु राज्य सरकार कडून अद्याप पर्यंत निधी आलेलच नाही यामुळे शासनाने तुटपुंजे अनुदान देऊन या योजनेचा फज्जा उडवलेला आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहेएकीकडे या योजनेसाठी मोदी व केंद्रीय समाज कल्याण विभागाने देशात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नव्याने ही योजना कार्यान्वित करून ‘डॉ. आंबेडकर स्कीम फॉर सोशल इंटीग्रेशन थ्रू इंटरकास्ट मॅरेज’ असे नामकरण करुन या योजनेअंतर्गत अडीच लाख रु पये अशी अनुदानात वाढ केली आहे परंतु दुसरीकडे मात्र निधी अभावी गेल्या २ ते३ वर्षात या प्रकरणांना भरीव निधी न मिळाल्याने धूळखात पडली आहेत.अस्पृश्यता निवारणार्थ आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ३ सप्टेंबर १९५९ पासून ही योजना कार्यान्वित केली. महाराष्ट्र शासनाने ३० जानेवारी १९९९ च्या शासन निर्णयाद्वारे या योजनेच्या आर्थिक साहाय्यात वाढ करून १५ हजार रु पये आर्थिक साहाय्य देणे सुरू केले होते. तथापि, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश, चंदीगड आदी राज्यांत अशा जोडप्यांना ५० हजारांपर्यंत अनुदान देण्यात येते. याच धर्तीवर महाराष्ट्रातही १ फेब्रुवारी २०१० पासून अर्थसाहाय्य वाढवून ५० हजार केले आहे.