शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची तस्करी, भाजीपाला-गुटख्यासह ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 02:50 IST

वाहतूक नियंत्रण शाखा आणि मनोर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भाजीपाल्याबरोबरच गुटखा भरलेला हा ट्रक पकडून तो जप्त करण्यात आला आहे.

आरिफ पटेलमनोर : सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन असून सर्व राज्ये आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. मात्र, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरई सातीवली येथे ‘अत्यावश्यक सेवा’ लिहिलेल्या एका भाजीपाल्याच्या ट्रकला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे आढळून आले. वाहतूक नियंत्रण शाखा आणि मनोर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भाजीपाल्याबरोबरच गुटखा भरलेला हा ट्रक पकडून तो जप्त करण्यात आला आहे. हा ट्रक अपघातग्रस्त झाल्याने हा प्रकार उघड झाला.गुजरातहून मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारी वाहने येतात. असाच भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक पालघरमधील सातीवली येथे चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. तेव्हा भाजीपाल्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा लपवून ठेवलेला आढळला. मनोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.लॉकडाउनच्या काळात सर्व राज्यांच्या, तसेच जिल्ह्यांच्याही सीमा सील केल्या आहेत. तपासणीसाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. नागरिकांची उपासमार होऊ नये, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने अशा वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा काही ट्रकचालक-मालक घेत असल्याचे दिसून येते आहे.