शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका निवडणुकीआधीच धूमशान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 01:42 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या १० सभा; शिवसेनेची धुरा एकनाथ शिंदेंवर

विरार : वसई-विरार महापालिकेची आगामी निवडणूक सर्वच पक्षांनी कधी नव्हे ती प्रतिष्ठेची बनवली आहे. आतापर्यंत बहुजन विकास आघाडीच्या हातात असलेली महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी करताना दिसत आहे.बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या वेळी सर्वच्या सर्व म्हणजेच ११५ पैकी ११५ जागा निवडून आणण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांचे शिवसेना-भाजप यांना थेट असलेले आव्हान मोडीत काढण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनेही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केल्याची माहिती आहे.या रणनीतीचा भाग म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १० सभा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे दोन रोड शो वसईत आयोजित करण्याच्या विचारात आहे.विशेष म्हणजे भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी मागील वसई दौऱ्यात भाजप पालिकेच्या सर्वच जागा लढवणार असून; आगामी महापौर भाजपचाच असेल, अशी घोषणा करून कार्यकर्त्यांत स्फुल्लिंग पेटवले होते. याचे पुढचे पाऊल म्हणून वसई भाजपने नुकतीच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या घरासमोरून बाइक रॅली काढून आपले शक्तिप्रदर्शन केले होते.दरम्यान, वसई शिवसेना तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी शिवसेनेची संपूर्ण धुरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालघर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यावर असेल, असे सांगतानाच पालिकेत शिवसेनेचीच सत्ता असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या अनुषंगाने वसई शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.शिवसेनेनेचे जिल्हाप्रमुखपद हे पालघर जिल्ह्यात आहे. त्यामुळे शिवसेना वसई-विरार शहर जिल्हाप्रमुख असे आणखी एक पद निर्माण करून कार्यकर्त्यांना बळ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे